राज्याला 'जोवाड' चक्रीवादळाचा धोका, IMD कडून सतर्कतेचा इशारा

cyclone
cycloneesakal
Updated on

पुणे : एकीकडे ऐन थंडीत महाराष्ट्रातील (maharashtra) अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता 'जोवाड' चक्रीवादळ (Cyclone Jovad) येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून IMD ने आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.

यलो अलर्ट जारी

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच गेले २ दिवस पावसाची संततधार सुरू आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्यानं आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पाऊस पडत आहे.ऑक्टोबरमध्ये हिट आणि पावसाळा अनुभवल्यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील वरुणराजा बरसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्यानं आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. तिकडे विदर्भात मात्र थंडीने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आलं आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये गारवा निर्माण झाला आहे.

cyclone
राष्ट्रगीताचा अवमान, ममतांविरोधात मुंबई भाजपची तक्रार

चक्रीवादळाचा फटका?

आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती 3 डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

cyclone
कोकण मार्गावर आता साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाड्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()