Cyrus Mistry : अपघातापूर्वी ताशी 100 चा वेग अन् 5 सेकंद आधी...; मर्सिडीजचा अहवाल काय?

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) त्यांचा प्राथमिक अहवालही पोलिसांना सादर केला आहे.

cyrus mistry
cyrus mistrysakal
Updated on

Mercedes Submit Report Of Cyrus Mistry Car : अपघाताच्या पाच सेकंद आधी सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा ताशी वेग १०० किलोमीटर प्रतितास होता. तसेच अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबण्यात आला होता, असा अहवाल लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीने गुरुवारी पालघर पोलिसांकडे दिला आहे. याशिवाय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) त्यांचा प्राथमिक अहवालही पोलिसांना सादर केला आहे. या अपघातानंतर याच्या तपासाचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज बेन्झ जीएलसी गाडीतील डेटा चीप ही जर्मनीला पाठवण्यात आली होती. त्याचा आहवाल आता समोर आला आहे.


cyrus mistry
एकनाथ शिंदेंचं संपूर्ण नियोजन बिघडण्याचा धोका, आमदार घरवापसीच्या मार्गावर?

सायरस मिस्त्री यांच्यासह इतर तीनजण मर्सिडीज-बेंझ कारने अहमदाबाहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी डहाणूजवळील चारोटी येथील पुलावर चालक अनाहिता पांडोळे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते दुभाजकाला धडकले यात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कंपनीकडे अनहित यांनी कार ताशी 100 किमी वेगात असताना ब्रेक दाबला की, त्याच्याआधीच दाबला होता अशी विचारणा केली होती. तसेच किती वेळा ब्रेक दाबवण्यात आला होता असे काही प्रश्न विचारले होते.


cyrus mistry
Ambadas Danve : दानवेंच्या विधानाची राज्यभर चर्चा; म्हणाले, ''दगड धोंडे जरी...''

मर्सिडीजच्या अहवालात काय?

मर्सिडीज-बेंझने आपल्या अहवालात सांगितले की, अपघात घडण्याच्या पाच सेकंद आधी वाहनाचा वेग ताशी 100 किलोमीटर (किमी प्रतितास) होता. अनहिताने ब्रेक लावल्यानंतर त्याचा वेग ताशी 89 किमीवर आला आणि धडक झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबवण्यात आल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. पुढील माहिती मिळवण्यासाठी मर्सिडीज कंपनी 10 सप्टेंबरला अपघातग्रस्त कार शोरुममध्ये घेऊन जाणार आहे. हाँगकाँगमधील एक पथक येऊन या कारची पाहणी करणार असून, त्यानंतर सविस्तर चौकशी अहवाल सोपवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.