Dada Bhuse Video: मारहाणीच्या व्हिडीओवर दादा भुसेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, जर असं केलं...

दादा भुसे यांच्यावर तरुणाला धमकावल्याचा आणि मारल्याचा आरोप
Dada Bhuse Video
Dada Bhuse Videoesakal
Updated on

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर केला होता.

हेही वाचा-जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

या व्हिडिओमध्ये मंत्री दादा भुसे यांच्यावर तरुणाला धमकावल्याचा आणि मारल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी शिंदे गटाच्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेयर केला असून त्यात मंत्री भुसे हे तरुणाला शिवीगाळ करत पोलिसांसमोर मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आता या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Dada Bhuse Video
Dada Bhuse : हा *** शिवीगाळ करत दादा भुसेंची पोलिसांसमोर तरुणाला जबर मारहाण

ते म्हणाले की, "२३ तारखे पासून आम्ही मालेगावमध्ये शिवपुरान वाचनाचा कार्यक्रम घेतला आहे, तिथे लाखो महिला भाविक श्रवण करण्यासाठी येतात त्यावेळी काही घटना घडली होती ती सांगण्यासारखी नाही, त्यामुळे त्या ठिकाणी त्या क्षणी मी तस केलं नसतं तर खुप मोठी घटना तिथे घडली असती.

म्हणून आम्ही किरकोळ गोष्टीतून तो प्रश्न आम्ही मार्गी लवला आहे. मंत्री म्हणून मी त्या कृतीचं समर्थन करत नाही. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता या घटनेवर पडदा पडतो की नाही हे पाहवं लागेल.

दरम्यान व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.