Dada Kondke Death Anniversary : असं काय घडलं होतं की दादा कोंडकेंनी मध्यरात्री 'मातोश्री' गाठली?

dada kondke death anniversary
dada kondke death anniversaryesakal
Updated on

जेव्हा अभिनेते दादा कोंडके यांच्याबद्दल बोललं जातं, लिहिलं जातं तेव्हा तेव्हा शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला जातो. दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकालायला मिळतात.  आज दादांचा स्मृतीदीन. त्याचनिमित्ताने त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या मैत्रीचा एक किस्सा पाहुयात.

बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्‍यात एक नाते होते. बाळासाहेबांचे मराठी विषयीचे प्रेम आणि रसिकता यामुळे त्‍यांच्‍यात आणि दादांमध्‍ये विशेष जवळीक होती. त्याचमुळे कोणतेही तमा न बाळगता ते शिवसेनेचा प्रचार करायचे.

dada kondke death anniversary
Benefits Of Lemon Water : लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी फायदे

मराठी चित्रपटांना आजच्या हिंदी निर्मात्याच्या लॉबिंगपुढे जसे गप्प पडावे लागते तसेच पूर्वीच्या काळीही होत. किंबहूना आता पेक्षाही पूर्वी वाईट स्थिती होती. एकदा दादा कोंडकेंचा चित्रपट थिएटवरवाले लावत नव्हते. मग याची माहिती बाळासाहेबांना कळाली मग काय दादा कोंडकेंचा चित्रपट लावणार नसतील तर ‘मराठा मंदिर’ वर राडा करण्‍याचा आदेश शिवसैनिकांना सोडला होता.

dada kondke death anniversary
Lemon Peel Use : उन्हाळ्यात लिंबू वापरताना साल फेकू नका, असा करा वापर; वाचा टू इन वन उपाय

त्या चित्रपटगृहाच्या बाहेर स्वत: बाळासाहेब ठाकरे गेले आणि त्यांनीच त्या मालकाला धारेवर धरलं. त्यानंतर बाळासाहेब कपूरला म्हणाले, "देखो कपूर, आज के बाद पिक्चर जितने चलेगी, आप थिएटर में नहीं आएंगे.

dada kondke death anniversary
Health Tips : उन्हाळ्यात ताक जास्त पिण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या

त्यानंतर 'कोहिनूर'मध्ये 'सोंगाड्या' तब्बल 37 आठवडे हाऊसफुल्ल चालला. बाळासाहेबांना कपूर इतका घाबरला होता की, दादा कोंडकेंनी अनिता पाध्ये यांना आठवणी सांगताना म्हटलं होतं की, नंतर कपूर नेहमी मला फोन करून विचारायचा, आपकी कोई फिल्म आने वाली है क्या?.

dada kondke death anniversary
Ajit Pawar News: CM पदी शिंदे पण फडणविसांनी केला करेक्ट कार्यक्रम, अजित पवारांनी आकडेवारीच दाखली वाचून

अनिता पाध्येंनी शब्दांकन केलेल्या 'एकटा जीव'मध्ये दादांनी सांगितलंय की, "बाळासाहेब कधी कुठल्यातरी कारणांवरून संतापलेले असले की, रात्री अकरा-साडेअकराला सुद्धा मीनाताई मला फोन करायच्या. साहेब चिडलेत, तुम्ही घरी या, असं त्या सांगायच्या.

dada kondke death anniversary
Shivsena: 'तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या...' शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

मग दादा कोंडके बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून बाळासाहेबांना बोलते करायचे. कधी एखादा अस्सल 'कोंडके स्टाईल' विनोद सांगायचे. मग दोघेही मध्यरात्र होईपर्यंत हसत बसायचे. दादांशी बोलल्यानं संतापलेले बाळासाहेब नॉर्मल व्हायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.