Dahi Handi : पुण्यातील दहिहंडी उत्सवात अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं

Dahi Handi
Dahi Handi Sakal
Updated on

पुण्यातील बावधन येथील दही हंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी एका गाण्याचं कडवंही सादर केलं.

सरकार आल्यावर जसं मोकळं वाटतं, तसंच ठाण्यात आल्यावर जास्त मोकळं वाटतं : फडणवीस

ठाण्यातील वसंत विहार या ठिकाणी भाजप माथाडी कामगार विभागाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या दहीहंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी फडणवीस म्हणाले, काल झालेल्या निर्णयाचं समाधान वाटतं आहे. आतापर्यंत चांगल्या प्रकारे दहीहंडी सण साजरा झाला असून यापुढंही निर्विवाद चांगला होणार आहे. सरकार आल्यावर जसं मोकळं वाटतं, तसंच ठाण्यात आल्यावर जास्त मोकळं वाटते, असं ते म्हणाले.

दहीहंडी उत्सवादरम्यान 78 जण जखमी, 11 जणांवर उपचार सुरू

महाराष्ट्र : दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत एकूण 78 जखमींची नोंद झाली असून त्यापैकी 67 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलंय. तर, 11 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाची हंडी फोडतोय, हे लवकरच दिसेल; राजन विचारेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाची हंडी फोडतोय, हे त्या वेळेला दिसेल. या उत्सवामध्ये अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत हा उत्सव एकत्रित येण्याचा सण आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या पक्षासाठी काम करत असतो, असं स्पष्ट रोखठोक मत खासदार राजन विचार यांनी व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाला प्रत्युत्तर दिलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वप्नील जोशीनं केलं कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन. कारण, त्यांनी दहीहंडीला खेळाचा विशेष दर्जा दिलाय. 10 लाखांचं विमा कवचही दिलंय. शिवाय, सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण देवून फारचं चांगला निर्णय घेतलाय, असं म्हणत स्वप्नील जोशीनं मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय.

आम्हीसुद्धा भ्रष्टाचाराची हंडी फोडणार : देवेंद्र फडणवीस

राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरळीमधील जांबोरी मैदानातील भव्य दहीहंडी फोडण्यात आली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा क्रम सुरू झाला आहे. आम्ही सुद्धा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असं देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दहीहंडी फोडत जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आशिष शेलार, प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते.

राजकीय दहीहंडी कुठेही केलेली नाही- आदित्य ठाकरे

राजकीय दहीहंडी कुठेही केलेली नाही. दोन वर्षांच्या कोविडच्या काळानंतर सर्वजण अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा करत आहेत. आज मला राजकीय बाबींवर भाष्य करायचं नाहीये," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

डोंबिवली : भाजपच्या दहिहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली : भाजपतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डोंबिवली शहर भाजपतर्फे यंदाही डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात दहीहंडी उत्सवाचं दणक्यात आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित आहेत. या दहीहंडी उत्सवाला सकाळपासूनच अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावत थरांची सलामी दिलीय. यावेळी मंत्री चव्हाण यांनी कोविड काळातही भाजपतर्फे सर्व निर्बंध आणि नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा केल्याचं चव्हाण यांनी सांगितल.

दोन वर्षानंतर डोंबिवलीत रंगतोय दहीहंडीचा थरार

डोंबिवली : दोन वर्षानंतर दहीहंडीचा थरार डोंबिवलीकर अनुभवत आहेत. सर्व पक्षांच्या वतीने डोंबिवलीत ठीकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 नंतर विविध पथके दहीहंडीला सलामी देण्यासाठी येऊ लागली आहेत. पावसाने उगडीप दिल्याने कडकडीत ऊन पडले आहे. यामुळे पावसाच्या पाण्यात नाही घामाच्या धारांत गोविंदा न्हाऊन निघाले आहेत. काही ठिकाणी पाण्याचे शॉवर गोविंदाना भिजवण्यासाठी ठेवण्यात आले आहे.

आम्ही देखील 50 थरांची हंडी फोडली; दहीहंडी सोहळ्यात एकनाथ शिंदेंचं भाष्य

टेंभीनाका, ठाणे : गोविंदा पथकांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पथकांचं कौतुक केलं. गोविंद पथकांच्या आम्ही तीन मागण्या मान्य केल्या आहेत. या सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर केली, 10 लाखांचा विमा दिला आणि आता दहीहंडीचा साहसी खेळात समावेश केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि गोविंदांचं आहे, असं देखील शिंदेंनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्तांरावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, आम्ही देखील 50 थराची हंडी फोडलीय, असं त्यांनी म्हटलंय.

एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत, यापेक्षा आम्हाला काय हवं : श्रध्दा कपूर

टेंभीनाका, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत, याच्यापेक्षा आम्हाला आणखी काय हवं, असं मत अभिनेत्री श्रध्दा कपूर यांनी व्यक्त केलं. यावेळी कपूर यांनी दिघेंबाबतही आपली भावना व्यक्त केली. त्या युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याला उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यात हजेरी

ठाणे : गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात पोहोचले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

वसई, विरारमध्ये दहीहंडीचा उत्साह

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. वसई, विरारमध्ये आज सकाळपासून गोविंदा पथकांमध्ये दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे.

गिरगावात मनसेकडून भव्य दहीहंडीचे आयोजन

गिरगावमध्ये मनसेकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आलंय. तब्बल दोन वर्षांनी कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यामुळं निर्बंधमुक्त वातावरणात दहीहंडीचा उत्सव पार पडत आहे.

डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या - तृप्ती देसाई

वर्षातून एक दिवस दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्यापेक्षा दररोज साहसी डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, आशीर्वाद तरी मिळतील असे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

दक्षिण मुंबईत गोविंदाचा धूम धडाका

मुंबादेवी : नवा जोश नवा उत्साह आणि नव्या साहसी संकल्पनेला सलामी देत गोविंदा दहीहंडी चे लक्ष्य प्राप्तीसाठी निघाले जल्लोषात. उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळ 75 वे अमृत महोत्सव साजरे करीत असून त्यांनी गरुडावर स्वार होऊन नरकासुराचा वध करण्यास सज्ज चलचित्रातुन श्रीकृष्ण साकारला आहे. (छाया चित्र : दिनेश चिलप मराठे)

मुंबईत 12गोविंदा जखमी

मुंबईमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी मनोरा तयार करताना १२ गोविंदा जखमी झाले आहेत. यातील पाच जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 7 जण रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती BMC ने दिली आहे.

जांबोरीत गोविंदा पथकांमध्ये नाराजी

जांबोरीत 6 थराला एक हजार दिले जात असल्याने गोविंदा पथकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून, दहीहंडी फोडण्यासाठी आलेले अनेक गोविंदा पथक कमी पैशांमुळे परत जात आहेत.

पुणेकरांना वेळेचं बंधन 

कोरोनामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे यासाठी पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार रात्री 10 वाजेपर्यंतच पुण्यातील दहीहंडी पथकांना जल्लोष करता येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातील विविध बागात पुणे पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जांबोरी मैदानाचा मुंबई पोलिसांनी घेतला आढावा

शिवसेेनेच्या बालेकिल्ल्यात यंदा प्रथमच भाजपकडून दहिहंडी उत्सवाचे आयोजन केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दहीहंडीला भेट देणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा पोलिसांकडून घेण्यात आला.

ठाण्यातील शिंदे गटाच्या दहीहंडीकडे सर्वांचे लक्ष

सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील दहीहंडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, ही दहीहंडी 51 लाखांची असणार आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी मानली जाणारी आमदार राम कदम यांच्या दहीहंडीच देखील आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेल आहे.

दहीहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार

देशासह राज्यभरात आज दही हंडीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंद पथकांना दिलेल्या सोयी सुविधांमध्ये आणखी एक मोठी घोषणा केली आहे. गोविंदांना दहिहंडी फोडताना दुखापत झाल्यास अशा गोविंदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत काल गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आहे.

दहीहंडी आयोजकांवर असणार लक्ष; नियम मोडल्यास दाखल होणार गुन्हा

दहीहंडी दरम्यान काही वेळा दुर्घटनामध्ये गोविंदा जखमी होऊन मृत्युमुखी पडतात. काहींना आयुष्यभर अपंगत्व येते. त्यात यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थराचा उंचीवर निर्बंध हटविल्याने गोविंदाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी न्यायालयाचा आदेशांचे पालन न करणाऱ्या दहीहंडी आयोजक आणि संयोजकांवर विशेष लक्ष असणार आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहे.

Maharashtra Dahi Handi Live Updates : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी होत असल्याने सेलिब्रिटी थाटही पाहायला मिळत आहे. यंदा पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीत राजकीय खेळी बघायला मिळणार असून, पुण्यात सगळ्यात मोठया दहीहंडीचे आयोजन शिंदे गटाचे नगरसेवक नाना उर्फ प्रमोद भानगिरे यांच्या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.