राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज अडीज हजार अधिक रुग्णांची वाढ झाली असून २५,८३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात २५,८३३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून कालच्या तुलनेत ही अडीज हजारांनी वाढली आहे. तर ५८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १२,७६४ रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २३,९६,३४० इतकी झाली असून आजपर्यंत २१,७५,५६५ रुग्णांवर यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात सध्या १,६६,३५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजवर ५३,१३८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वाधिक कोरोना रुग्णवाढीत पुणे आघाडीवर आहे. शहरात आज दिवसभरात २,७५२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ८८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच शहरात दिवसभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून यांपैकी ६ रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या ४४० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिकेने ही माहिती दिली.
मुंबईत आढळले सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण
मुंबईत आज पुण्याच्या तुलनेत अधिक रुग्ण आढळले असून आज २,८७७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर १,१९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ३,५२,८३५वर पोहोचली. शहरात आजवर ३,५२,८३५ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या १८,४२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजवर ११,५५५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.