Ajit Pawar: ‘मविआ’कडून अजित पवारांच्या नेतृत्वाला डॅमेज; भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

उद्धव ठाकरेंवरदेखील सडकून टीका
Ajit Pawar - Eknath Shinde
Ajit Pawar - Eknath Shindeesakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते जिथे जातील, तिथे गर्दी होते. परंतु, ही गर्दी निवडणुकीचा पॅरामीटर ठरत नाही. तसेच अजित पवार यांनी गेल्या सहा महिन्यांत भाजपशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला नाही. उलट महाविकास आघाडीतील नेतेच अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करून त्यांना डॅमेज करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत बोलताना केले.

सोलापूर दौऱ्याप्रसंगी शिवस्मारक सभागृहात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते राज्यातील राजकीय घडामोडींविषयी बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, धैर्यशील मोहिते-पाटील, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे आदी उपस्थित होते.

Ajit Pawar - Eknath Shinde
Karnataka Assembly Election Results 2023 : भाजपला धक्का! येडियुरप्पांचा मुलगा विजयेंद्र ४ हजार मतांनी पिछाडीवर

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पेच, गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेली धुसफूस, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, उद्धव ठाकरेंची नैतिकता, खासदार संजय राऊत यांची बेताल वक्तव्य आदी राज्यातील राजकीय घडामोडींबाबत बोलताना विरोधकांवर श्री बावनकुळे यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले ८४ वयाचे शरद पवार यांना राजीनामा कोणी मागितला होता? त्यांनीच राजीनामा दिला, त्यांचीच समिती आणि पुन्हा त्यांनीच राजीनामा मागे घेतला हे तीन दिवसांचे नाटक होते. राजीनामा दिलाच होता, मग माघारी का घ्यावा? राष्ट्रवादीने पक्ष स्थापनेपासून कधी शंभर प्लस आकडा गाठला का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये नेते होते. परंतु, उद्धव ठाकरे हे ‘रडोबा’ आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते रणांगणातून पळून गेले. त्यांच्या तोंडात नैतिकता हा शब्द शोभत नाही. त्यांनी २०१९ मध्येच नैतिकता सोडली आहे. उद्धव ठाकरे यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही. श्री ठाकरे यांचे नेतृत्व अपयशी ठरल्याची सडकून टिका प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Ajit Pawar - Eknath Shinde
Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसची जोरदार मुसंडी; तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आघाडीवर

आश्‍चर्य वाटणारा भाजप पक्ष प्रवेशाचा आकडा

येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप संघटनात्मक उपक्रम घेत असून ‘घर चलो’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभेत ६० हजार नागरिकांशी संपर्क साधणार आहे. प्रत्येक बुथवर २१ जणांची समिती करण्यात येणार आहे. मतदारसंघातील यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५ मे ३० जूनपर्यंत अनेक निवडी होणार आहेत. प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या जिल्ह्यात १० मंत्री दौऱ्यावर असतील. केवळ विकासावर बोलतील आणि विकासासाठी प्रयत्न करतील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आगामी काळात सर्वांना आश्चर्य वाटेल इतक्या मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होतील, असा दावाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला.

सोलापुरातील प्रलंबित प्रश्न सोडविणार

सोलापूर शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये कोणावर टीका करून मत मागण्याची भाजपला आवश्यकता नाही, जनतेला सामोरे जाताना आम्ही विकासावर मत मागणार आहोत. शहरातील ती चार विकास कामे आगामी दौऱ्यापूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिली.

खासदार संजय राऊत एक...मात्र सौंदर्यप्रसाधने अनेक

खा. संजय राऊत हे बेताल व्यक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. ते काँग्रेसचा साबण लावतात. राष्ट्रवादीची पावडर वापरतात. तर कपाळावर शरद पवारांचा टिळा लावून शिवसेनेला स्वच्छ धुऊन काढतात, अशी मिस्कील टिप्पणी बावनकुळे यांनी यावेळी केली.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा म्हणजे एक इव्हेंट

राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो’ यात्रा ही एक इव्हेंट होती. प्रत्येक जिल्ह्यात यात्रा आल्यावर जसे स्वागत होते, तसे स्वागत झाले. इव्हेंट संपला, विषय संपला. त्यानंतर भारत जोडो यात्रेतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केले. गेल्यावेळी काँग्रेसचे जितके खासदार निवडून आले होते, त्यापेक्षाही यंदा काँग्रेसची संख्या कमी असेल.

Ajit Pawar - Eknath Shinde
Karnataka Assembly Election Results 2023 : भाजपला मोठा धक्का! भाजपचे 8 कॅबिनेट मंत्री पिछाडीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.