Sunil Tatkare : आम्ही सर्वच निवडणुकींना महायुती म्हणून सामोरे जाणार; खासदार तटकरेंची NCP मेळाव्यात मोठी घोषणा

सर्व निवडणुकींना महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत - सुनील तटकरे
Dapoli NCP Melava Sunil Tatkare Ajit Pawar
Dapoli NCP Melava Sunil Tatkare Ajit Pawaresakal
Updated on
Summary

राष्ट्रवादी पक्षाने आपल्या विचारधारेमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय आहे.

दाभोळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) स्थापनेपासून धर्मनिरपेक्षता हा या पक्षाचा मुख्य विचार राहिला असून राज्यामध्ये शिवसेना व भाजपसोबत गेल्यावरही आम्ही आमचा विचार सोडलेला नाही, असं स्पष्ट मत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊनच महाराष्ट्राचा विकास करणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दापोलीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात व्यक्त केलं.

Dapoli NCP Melava Sunil Tatkare Ajit Pawar
Ravikant Tupkar : तेच तेच म्हणणे कितीवेळा मांडू? तुपकरांचा राजू शेट्टींना उद्विग्न सवाल; दहा पानांच्या पत्रातून भूमिका जाहीर

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दोन दिवस दापोली व मंडणगडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दापोलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत मॅरेथॉन बैठक घेतली. दापोलीमध्ये बहुतांश कार्यकर्ते हे अजित पवार यांच्यासमवेत असल्याबाबत समाधान व्यक्त करतानाच आगामी वाटचाल ही आपल्याला आतापर्यंत वैचारिक विरोधक राहिलेल्या शिवसेना व भाजपबरोबर करावयाची आहे.

आपण सरकारमध्ये सामील झालो असल्याने गतिमान सरकार ही संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचवावी लागेल. ते म्हणाले, समाजातील अल्पसंख्यांक घटकांमध्ये राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर एक वेगळा संदेश गेला असला तरी आपण सर्व एक आहोत, हीच भूमिका राज्यातील सत्ताधारी पक्षाची आहे. सरकारची ही भूमिका सर्वसामान्य घटकापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांने पोहोचवणे गरजेचे आहे.

Dapoli NCP Melava Sunil Tatkare Ajit Pawar
NCP Crisis : राजकीय घडामोडी सुरु असताना अजितदादा शरद पवारांना का भेटले? अखेर कारण आलं समोर; खुद्द दादानीच केला खुलासा

राष्ट्रवादी पक्षाने आपल्या विचारधारेमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय असून संपूर्ण राज्यामध्ये वेगवान पद्धतीने निर्णय केले जात असून विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्यात समन्वय राहावा यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

आपण जिल्हा नियोजन समितीला उपस्थित राहण्यापूर्वी या समितीमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांनादेखील संधी मिळावी म्हणून शासन नियुक्त निमंत्रित सदस्य म्हणून दापोलीतील मोहन मुळे यांची नियुक्ती करून घेतली. अन्य तिघांना जिल्ह्यामध्ये संधी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Dapoli NCP Melava Sunil Tatkare Ajit Pawar
LokSabha Election : लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार ठरले! कोल्हापुरातून 'हे' नेते लढवणार निवडणूक? महाडिकांनी दिले स्पष्ट संकेत

मागील सरकारच्या काळात विविध देवस्थान व पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी जी मंजुरी मिळाली होती ती विकासकामे लवकरच पूर्णत्वास जातील. त्याचप्रमाणे दापोली व मंडणगड नगरपंचायतीसाठी ५ कोटींचा निधी लवकरच देण्यात येईल. राज्य सरकारमध्ये महिला व बालकल्याणमंत्री म्हणून आदिती तटकरे या कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून दापोलीमध्ये बचतगटांना विविध कामांसाठी निधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.

Dapoli NCP Melava Sunil Tatkare Ajit Pawar
Loksabha Election : भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला प्रत्युत्तर देण्यासाठी डीकेंनी आखली मोठी रणनीती; कर्नाटकात जोरदार हालचाली

सर्वच ठिकाणी मनोमिलन होणार नाही - तटकरे

सर्व निवडणुकींना महायुती म्हणून सामोरे जाणार आहेत. परंतू इतक्या वर्षाच्या वैचारिक लढाईनंतर सर्वच ठिकाणी मनोमिलन होणार नाही, हे देखील आम्हाला मान्य असल्याचे सूचक वक्तव्य तटकरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.