Dasara Melava: दसऱ्याच्या मुहूर्तावर आज महाशक्तिप्रदर्शन, चार मेळाव्यांमध्ये धडाडणार तोफा; कोण काय बोलणार याकडे लक्ष

दसऱ्यानिमित्ताने आज होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे
Dasara Melava
Dasara MelavaEsakal
Updated on

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर परस्परांवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे मुंबईत आज(ता. २४) दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. (Latest Maharashtra News)

आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा होत आहे. दादर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी एक लाखांहून अधिक कार्यकर्ते येतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. (Latest Marathi News)

Dasara Melava
Gold Rate Today: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

‘वाजत गाजत गुलाल उधळत या...’ असे भावनिक आवाहन शिंदे गटाकडून करण्यात आले आहे. आझाद मैदानात मेळाव्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य होर्डिंग लावण्यात आले आहेत. मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. साधारणपणे सायंकाळी पाच वाजता हा मेळावा सुरू होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या नावाचे बॅनर्स झळकले आहेत.

Dasara Melava
Dussehra 2023 : भारताच्या विविध भागांत अन्नपदार्थांची विविधता! दसऱ्याच्या दिवशी हे पदार्थ मानले जातात शुभ

ठाकरे गटानेही कंबर कसली

गेल्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मैदानावर; तर ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर झाला होता. यंदा शिंदे गटाने शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा आपला दावा मागे घेतल्याने ठाकरे गटाचा मेळावा तिथे होत आहे. सायंकाळी सात वाजता ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. यानिमित्त ठाकरे गटानेही शिवाजी पार्कवर मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. साधारण एक लाख कार्यकर्ते जमविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ठिकठिकाणी जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुखांना विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. ठाकरे गटानेही होर्डिंग झळकावत दसरा मेळावा यशस्वी करण्याचा चंग बांधला आहे. (Marathi Tajya Batmya)

टीझरच्या माध्यमातून हल्लाबोल

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून टीझर प्रदर्शित करण्यात आला. ‘गर्दी तीच, जल्लोष तोच आणि मैदान तेच’, अशा शब्दांत शिवसेना कार्यकर्त्यांना मेळाव्याला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसऱ्या टीझरमध्ये दसरा मेळावा म्हणजे मर्दांचा मेळावा असल्याचे म्हणत शिंदे गटावर गद्दार आणि खोक्यांचे सरकार, अशी टीका करण्यात आली आहे.

Dasara Melava
1996

संघ कार्यक्रमास शंकर महादेवन

नागपूर : नेहमीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगरचा विजयादशमी सोहळा आज मंगळवारी (ता.२४) रोजी होणार आहे. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संगीतकार आणि गायक पद्मश्री शंकर महादेवन उपस्थित राहणार आहेत. व्यावसायिक आणि विद्यार्थी अशा दोन गटांमध्ये स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार असून सकाळी ६.२० पासून कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.

Dasara Melava
Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या आधीच झाली ठाकरेंच्या खास माणसाची चौकशी; वाचा काय आहे प्रकरण ?

भगवान भक्तीगडावर तयारी

पाटोदा (जि बीड) : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची ग्रामस्थांकडून जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त मुंडे समर्थक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईत तगडा बंदोबस्त

६ अपर आयुक्त

१६ उपायुक्त

४५ सहाय्यक आयुक्त

१२ हजार ५०० पोलिस कर्मचारी

मेळावे आणि ठिकाण

शिवसेना (शिंदे गट)- आझाद मैदान, मुंबई. सायं. ५.००

शिवसेना (ठाकरे गट) - शिवाजी पार्क, मुंबई. सायं.७.००

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - रेशीमबाग मैदान, नागपूर, स. ७.४०

पंकजा मुंडे भगवान भक्तीगड, ता.पाटोदा दु. १ वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.