दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनेनं आणि त्यानंतर शिंदे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. (Dasara Melava Cm Eknath Shinde delhi tour Amit Shah pm narendra modi )
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, शिंदे यांचा आणखी एक दिवसाचा मुक्काम वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मुक्कामादरम्यान मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींसह अमित शाह यांना देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्यात शिंदे गटाच्या मेळाव्याला मोदी शाह येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंची गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही केंद्रीय नेत्यासोबत भेट झाली नव्हती. पण, रात्री (गुरुवार) उशिरा ते अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास 30 ते 40 मिनिटं चर्चा सुरु होती. यावेळी दोघांमध्ये शिवसेनेसोबत असलेला संघर्ष, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, दसरा मेळावा अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोणाचा? उद्धव ठाकरे गटाचा की, शिंदे गटाचा? या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.