मेळाव्यात उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे वाकयुद्ध पाहायला मिळालं.
मुंबई : एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा बुधवारी (5 ऑक्टोबर) पार पडला. दोन्ही शिवसेना म्हणजेच, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोन स्वतंत्र्य सभा झाल्या. उद्धव ठाकरेंची सभा शिवाजी पार्क मैदानावर झाली आणि एकनाथ शिंदे यांची सभा बीकेसी मैदानावर झाली. दोन्ही सभेला तुफान गर्दी होती.
या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे वाकयुद्ध पाहायला मिळालं. दोन्ही गटांनी मोठी गर्दी जमवत आपलीच शिवसेना (Shiv Sena) खरी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान सर्वांचं लक्ष लागलं होतं ते शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाणे (Krupal Tumane) यांच्या दाव्याकडं. मुंबईतील बीकेसी इथं आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्यात दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरेंना धक्का देतील, असा दावा खासदार तुमाणेंनी केला होता.
मात्र, कालच्या दसरा मेळाव्यात कोणत्याही खासदार किंवा आमदाराचा प्रवेश होऊ शकला नाही. यामुळं खासदार तुमाणेंनी केलेला दावा फोल ठरला आहे, अशी चर्चा सुरु होती. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या उत्सवात सहभागी झाल्यानंतर खासदार तुमाणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला होता. दसरा मेळाव्यात दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील, असा त्यांनी छातीठोकपणे दावा केला. हा दावा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक असल्याचं बोललं जात होतं. मात्र, कालच्या मेळाव्याप्रसंगी कोणताही खासदार अथवा आमदार शिंदे गटात प्रवेश करु शकला नाही, त्यामुळं तुमाणेंचा हा दावा फोल ठरला असंच म्हणावं लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.