Dasra Melava : समानतेपासून लोकसंख्या नियंत्रणापर्यंत; भागवतांच्या भाषणातील 10 मुद्दे

'मंदिर, पाणी आणि स्मशानभूमी सर्वांसाठी समान असली पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडू नये.'
RSS chief Mohan Bhagwat
RSS chief Mohan Bhagwatesakal
Updated on
Summary

'मंदिर, पाणी आणि स्मशानभूमी सर्वांसाठी समान असली पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडू नये.'

नागपूर : आरएसएस (RSS) अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज नागपुरातील विजया दशमी (Nagpur Vijayadashami) सोहळ्याला हजेरी लावली. रेशम बागेत विजयादशमीनिमित्त दसरा मेळाव्याला संबोधित करताना मोहन भागवतांनी महिला स्वातंत्र्य आणि समानतेपासून लोकसंख्या नियंत्रणापर्यंतच्या कायद्यांचा पुरस्कार केला आहे. या सोहळ्याला गिर्यारोहक संतोष यादव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.

-संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले, मातृशक्तीकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही. आपण महिलांना जगाची माता मानतो, पण त्यांना पूजाघर किंवा घरांत कोंडून ठेवलं आहे. परकीय हल्ले संपल्यानंतरही त्यांना निर्बंधातून स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काम करू शकतात. मातृशक्ती जागृत करण्याचं काम आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.

-सगळे लोक नोकरीच्या मागं धावत असतील, तर आपण किती जणांना नोकऱ्या देणार? कोणत्याही समाजात सरकारी आणि खासगी अशा जास्तीत जास्त 10, 20, 30 टक्के नोकऱ्या असतात. बाकी सगळ्यांना आपलं काम करावं लागतं.

RSS chief Mohan Bhagwat
Dasra Melava : संपूर्ण जग आता भारताचं ऐकतंय, देशाचं वजन वाढलंय - मोहन भागवत

-लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यावर भर देत भागवत म्हणाले, जितकी लोकसंख्या जास्त तितका बोजा जास्त हे खरं आहे. लोकसंख्येचा योग्य वापर केला तर ते संसाधन बनतं. आपला देश 50 वर्षांनंतर किती लोकांना अन्न आणि आधार देऊ शकेल याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळं लोकसंख्येचं सर्वसमावेशक धोरण बनवून ते सर्वांना समानतेनं लागू केलं पाहिजे.

-स्वतंत्र भारतातही स्वार्थ आणि द्वेषाच्या आधारे समाजातील विविध घटकांमध्ये अंतर आणि वैर निर्माण करण्याचं काम सुरू आहे. त्यांची भाषा, पंथ, प्रांत, नीती कोणतीही असो, त्यांच्या भानगडीत न पडता त्यांच्याशी (कट्टरवादी) निर्दयीपणे वागून त्यांचा विरोध केला पाहिजे.

-आपल्या मित्रांमध्ये सर्व जाती आणि आर्थिक गटांचे लोक असावेत, जेणेकरून समाजात अधिक समानता आणता येईल, असा प्रयत्न केला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणामुळं विद्यार्थ्यांना चांगला माणूस बनवण्यासाठी आणि त्यांच्यात देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी मदत व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.

-लोकसंख्या नियंत्रणासोबतच धार्मिक आधारावर लोकसंख्या संतुलन हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. जेव्हा-जेव्हा एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल असतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमाही बदलतात. जन्मदरातील असमानतेबरोबरच हाव, लोभ, जबरदस्ती धर्मांतर आणि देशात होणारी घुसखोरी ही प्रमुख कारणं आहेत.

RSS chief Mohan Bhagwat
Dasara : दसऱ्याला रावण दहन केल्यास अ‍ॅट्रोसिटी दाखल करा; आदिवासी संघटना आक्रमक

-मंदिर, पाणी आणि स्मशानभूमी सर्वांसाठी समान असली पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडू नये. एक घोडेस्वारी करू शकतो आणि दुसरा करू शकत नाही, अशा गोष्टींना समाजात स्थान नसावं आणि या दिशेनं काम केलं पाहिजे.

-आमच्यामुळं अल्पसंख्याकांना धोका असल्याचं काही लोकांकडून धमकावलं जात असल्याचं ते म्हणाले. हा संघाचा स्वभाव नाही, ना हिंदूंचा. संघ बंधुता, सौहार्द आणि शांततेच्या बाजूनं उभे राहण्याची शपथ घेतो.

RSS chief Mohan Bhagwat
काळाचा घाला! वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाचा Heart Attack नं मृत्यू

-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले, हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची सर्वत्र चर्चा होत आहे. अनेकजण या संकल्पनेशी सहमत आहेत, पण 'हिंदू' या शब्दाला विरोध करतात आणि इतर शब्द वापरण्यास प्राधान्य देतात. आम्हाला यात कोणतीही अडचण नाही. संकल्पनेच्या स्पष्टतेसाठी आम्ही स्वतःसाठी हिंदू या शब्दावर जोर देत राहू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.