Dasra melava 2023 : विजयादशमी अन् राजकीय पक्षांचे मेळावे; जाणून घ्या त्या मागचा इतिहास

दसऱ्याचा संबंध सीमोल्लंघनाशी आहे व त्याला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे.
Dasra melava 2023  know Vijayadashami and  political parties Dasara mala history
Dasra melava 2023 know Vijayadashami and political parties Dasara mala history
Updated on

दसऱ्याचा संबंध सीमोल्लंघनाशी आहे व त्याला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे. मात्र, या दिवसाकडे बहुतांश राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शनाचा दिवस म्हणूनही पाहतात. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट यांच्यात शिवतीर्थावरील जागेवर मेळावा कोणी घ्यायचा, यावरून मोठा वादंग रंगला. विविध राजकीय पक्ष व त्यांच्या मेळाव्यांवरचा हा दृष्टीक्षेप.

शिवसेनेचा दसरा मेळावा

मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतरही मराठी माणसाला त्याचे हक्क मिळावेत या भावनेतून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ला शिवसेनेची स्थापना केली.

शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ला दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावरच झाला. ही सेनेची पहिलीच जाहीर सभा होती.

पुढे शिवसेनेत या दसरा मेळाव्याचा पायंडाच पडला आणि शिवसेनेच्या संस्कृतीत ती परंपराच निर्माण झाली.

पुढच्या काळात पक्षाची भूमिका आणि अजेंडा काय असेल, या बाबत बाळासाहेब दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करत.

‘सामना’ वृत्तपत्रातही विचारांचे सोन लुटायला चला अशा मथळ्यांनी आवाहन केले जायचे.

भारत पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही अशी घोषणा १९९१मध्ये बाळासाहेबांनी याच शिवतीर्थावर केली. तेव्हा शिवसेनेचे तत्कालीन नेते बाळा नांदगावकर यांनी वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी खणली होती. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला होता.

शिवसेनेच्या इतिहासात चार वेळा शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला नव्हता. २००६मध्ये पाऊस पडल्यामुळे हा मेळावा रद्द करावा लागला होता.

२००९ मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा मेळावा होऊ शकला नाही. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे हा मेळावा बंदिस्त हॉलमध्ये पार पडला होता.

Dasra melava 2023  know Vijayadashami and  political parties Dasara mala history
Dasara Melava: दसऱ्याच्या मुहूर्तावर आज महाशक्तिप्रदर्शन, चार मेळाव्यांमध्ये धडाडणार तोफा; कोण काय बोलणार याकडे लक्ष

मनसेचा मेळावा

राज ठाकरे यांनी २००६मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि मनसेची स्थापना केली.

त्यांनी पहिली जाहीर सभा शिवाजी पार्कातच घेतली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणे राज ठाकरे यांनीही गुढी पाडव्याला जाहीर सभा घेण्याची परंपरा सुरू केली.

Dasra melava 2023  know Vijayadashami and  political parties Dasara mala history
Dasara Nagpur2023 : २२ जानेवारीला प्रभू राम अयोध्येतील मंदिरात प्रवेश करतील; मोहन भागवतांनी दिली माहिती

‘आरएसएस’चा विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव २३ ऑक्टोबर १९२८मध्ये सुरू झाला.

पहिल्या संचलनात ५०० स्वयंसेवक सहभागी झाल्याची नोंद आहे.

नागपूर येथे होणाऱ्या या उत्सवात सरसंघचालक मुख्य मार्गदर्शन करतात. उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून गणमान्य व्यक्ती आमंत्रित असते.

देशाची सद्यःस्थिती, आगामी आव्हाने याबाबत सरसंघचालक मार्गदर्शन करीत असल्याने त्याकडे दिशादर्शक म्हणून पाहिले जाते.

गोपीनाथ मुंडेंचा दसरा मेळावा

नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावात भगवान गडावर दसरा मेळावा भरतो. गोपीनाथ मुंंडे यांच्या निधनानंतर आता मेळाव्याचे नेतृत्व त्यांची कन्या पंकजा मुंडे करतात. भगवान भक्तीगडावरील या मेळाव्यास वंजारी समाज मोठ्या संख्येने उपस्थित असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.