'झालं तेवढं बास झालं! आता आघाडी धर्माबाबत आम्ही ठरवू'

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on
Summary

'आता आगामी काळात सर्व निवडणुकांत शिवसेना स्वबळावर लढणार आहे.'

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीने (NCP) आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांत शिवसेना (Shivsena) स्वबळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशारा शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. कोरोनाच्या (Coronavirus) नवीन ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीच्या उपाययोजना राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी त्यांनी आज शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde), माजी आमदार सदाशिव सपकाळ, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, चंद्रकांत जाधव, नंदकुमार घाडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Shambhuraj Desai
नगरपंचायतीसाठी NCP आमदार शिंदे विरुद्ध सेनेच्या महेश शिंदे गटांत सामना?

मंत्री देसाई म्हणाले,‘‘गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत ठाकरे सरकारने केलेली विविध कामे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जनतेपर्यंत पोचविणार आहेत. कोविडच्या सव्वा वर्षाच्या कालावधीत राज्याचे एक लाख कोटींचे उत्पन्न घटले आहे. तरीही कोणत्याही विभागाला निधी कमी पडू दिला नाही. शेतकऱ्यांना २२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. सेवेत असताना मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांप्रमाणे ३९० जणांना मदत दिली. एकट्या कोविडसाठी साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले. कोरोना काळात मोदींनी खासदारांचा निधी गोठवला. पण, राज्य सरकारने आमदार फंडात एक कोटींनी वाढ करून तो चार कोटी केला. त्यापैकी ३० टक्के निधी कोविडसाठी खर्च केला. आगामी काळात आरोग्यसेवांसाठी पाच हजार कोटींची तरतूद केली असून, आतापर्यंत दोन हजार कोटी खर्च केले आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना ४,४९० कोटींचा मदत निधी दिला आहे. महिला सुरक्षेसाठी असलेल्या पथदर्शी प्रकल्पातून ३७ हजार महिलांनी ऑनलाइन प्रशिक्षण घेतले आहे.

Shambhuraj Desai
'भाजपकडून मला आमदारकीसाठी तिकीट देण्याची ऑफर'

जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी धर्म पाळला नाही. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळायचा का नाही, ते आता ठरवू.’’ जिल्हा बॅंकेत शिवसेनेला चार जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आमची होती, असे सांगून प्रा. बानुगडे म्हणाले, ‘‘आम्ही स्वत:च्या बळावर दोन जागा निवडून आणल्या आहेत.’’ महेश शिंदे म्हणाले,‘‘ जिल्हा बॅंकेत कोरेगाव आणि माणचे असे दोन संचालक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी विधानसभेवेळी शिवसेनेत प्रवेश केला, त्याचवेळी माझ्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सुनील खत्री हेही आमचेच आहेत.’’ कोरेगावात भावकी ही गाव व तालुकापातळीवर असेल. बाहेरच्या लोकांसाठी भावकी नाही, असा टोलाही त्यांनी शशिकांत शिंदेंना लागावला.

Shambhuraj Desai
राजकारण तापलं! पराभवाचा गृहराज्यमंत्री नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा बदला घेणार?

एका फोनवर मुख्यमंत्र्यांची मान्यता...

कोरोना काळात साताऱ्यात जम्‍बो कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी माझ्या एका फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही आदेशाची मागणी न करता मान्यता दिली होती, याची आठवण सांगून गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले,‘‘ जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या डोसचे ८५ टक्के, तर दुसऱ्या डोसचे ४५ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.’’

Shambhuraj Desai
बुरुज अबाधित ठेवून प्रतिष्ठेचा गड जिंकणं NCP, BJP, काँग्रेसमोर मोठं आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.