'ट्रेलर दाखवणारे चित्रपट चालतात, असं नाही ते फ्लॉपही होतात. मात्र मी..'
मोरगिरी (सातारा) : विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्यजित पाटणकरांना (Satyajit Patankar) जनतेने एकदा १८ आणि पुन्हा १५ हजार मतांनी पराभव करून अस्मान दाखवल आहे. मात्र, जिल्हा बँक निवडणूक (Satara District Bank Election) निकालाने ते हुरळून जाऊन चित्रपटातील ट्रेलरची भाषा करत आहेत. ट्रेलर दाखवणारे चित्रपट चालतात, असे नाही ते फ्लॉप होतात. मात्र, मी त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘शोले’ चित्रपटाचा (Sholey Movie) ट्रेलर दाखवणार असून तो सुपरहिट ठरेल, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सत्यजित पाटणकरांना लगावला.
नाटोशीत रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, जिल्हा परिषद सदस्या सुग्रा खोंदू, बशीर खोंदू, नथुराम कुंभार, सरपंच अविनाश कुंभार, उपसरपंच उदय देसाई, गणेश भिसे, चेतन देसाई, विष्णुपंत देसाई आदी उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, ‘‘विरोधकांचा बालेकिल्ला म्हणून पाटणकरांनी मोरणा विभाग विकासापासून वंचित ठेवला. त्यांनी विकासाच्या बाबतीत दुजाभाव केल्याने हा विभाग विकासापासून वंचित राहिला होता.
मी २००४ साली आमदार झाल्यावर विकासाचा रोडमॅप तयार केला. लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीवर नैतिक जबाबदारी आणि बांधिलकी जपत गट-तट न पाहता सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामे केली. कोरोनामुळे राज्याचे उत्पन्न एक लाख कोटींनी घटले. मात्र, विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही. पाटण विधानसभा मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी मी कटिबध्द आहे.’’ रामचंद्र कदम यांनी प्रास्ताविक केले. अॅड. मारुती देसाई यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.