"काठी न घोंगडं घेऊ द्या की..." धनगरी वेशातील अजित पवार खंडोबाच्या गडावर Video Viral

Ajit Pawar : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेजुरी येथे हजर राहिले होते.
Video Viral
Video ViralSakal
Updated on

Pune News: शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आहेत. तर यावेळी त्यांनी पुरंदर आणि परिसरातील विकास कामांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, आजच्या या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे अजित पवार यांच्या धनगरी पोशाखाने. त्यांनी धनगरी फेटा, घोंगडी, हातात काठी अन् कपाळाला भंडारा लावत धनगरी वेष परिधान केला होता. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या या वेषाने लक्ष वेधून घेतले होते.

Video Viral
"ती तुझ्याकडेच बघते, प्रपोज कर" मित्रांचं ऐकणं पडलं महागात; प्रपोज करायला गेला अन्... | Viral

विकास कामांवर काय म्हणाले अजित पवार?

"इथं विमानतळ झालं पाहिजे असं काहीजण म्हणतात तर काहीजण म्हणतात पुढं झालं पाहिजे. ज्यांच्या गावात विमातनळामुळं अडचणी येतात त्यांना वाटतं आमच्या पिढ्या, आमचं गाव वसलेलं आहे आम्ही का उठायचं. परंतू एक गोष्ट लक्षात घ्या. मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे.

विमानतळ करत असताना, हायवे करत असताना, शहर वाढवत असताना, धरणं वाढवत असताना, कॅनॉल, शिक्षण संस्था उभारत असताना ते कोणीही हवेत उभं करु शकत नाही. त्यासाठी जमिनीची गरज असते.

जमीन मर्यादित आहे, तिला चांगला मोबादला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाला योग्य पद्धतीने मोबदला देण्याची आमची भूमिका राहिल" असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.