Vishwajeet Kadam : पोषण आहारात सापाचे पिल्लू! विश्वजीत कदमांनी सभागृहात मांडला मुद्दा...

Nutritional diet : विश्वजीत कदम यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्षांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली. शासनाने याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहे. विश्वजीत कदम यांच्या पलूस-कडेगाव या मतदारसंघामध्ये ही घटना मंगळवारी उघडकीस आली होती.
Vishwajeet Kadam : पोषण आहारात सापाचे पिल्लू! विश्वजीत कदमांनी सभागृहात मांडला मुद्दा...

Winter Session 2024 : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात सदस्यांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात असतानाच काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी एक धक्कादाय मुद्दा उपस्थित केला आहे. पोषण आहारामध्ये चक्क सापाचं पिल्लू सापडल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं.

विश्वजीत कदम म्हणाले की, माझ्या मतदारसंघात पोषण आहारात सापाचे पिल्लू सापडले आहे. याचे राज्याचे टेंडर इंडो अलर्ट प्रोटीन कंपनीला दिले आहे. असं सांगून विश्वजीत कदमांनी पोषण आहाराचा फोटो सभागृहात दाखवला. ही अत्यंत गंभीर गोष्ट असल्याने कंपनी व प्रशासनातील इतर दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Vishwajeet Kadam : पोषण आहारात सापाचे पिल्लू! विश्वजीत कदमांनी सभागृहात मांडला मुद्दा...
PM Modi Speech: 'प्रपोगंडा ते संविधान...' पंतप्रधानांच्या राज्यसभेतील भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे

विश्वजीत कदम यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्षांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली. शासनाने याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहे. विश्वजीत कदम यांच्या पलूस-कडेगाव या मतदारसंघामध्ये ही घटना मंगळवारी उघडकीस आली होती.

गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्षांपर्यतच्या बालकांना शासनाच्यावतीने पोषण आहार दिला जातो. पलूस येथे अंगणवाडीमधून गर्भवीत माता-बालकांना पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं होतं. त्या डाळ,तांदूळ ,तिखट,मीठ एकत्र असणाऱ्या पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मृत वाळा साप आढळून आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर अंगणवाडी सेविकांना आहार वाटप न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Vishwajeet Kadam : पोषण आहारात सापाचे पिल्लू! विश्वजीत कदमांनी सभागृहात मांडला मुद्दा...
Ajit Pawar : नवाब मलिकांच्या बाबतीत अजित पवार ठाम? प्रश्न विचारताच म्हणाले, तुम्हाला काय त्रास...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा, तांदूळ, तूरडाळ, गहू, तिखट, मीठ आणि विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. परंतु गेल्या एप्रिल महिन्या पासून तयार म्हणजेच डाळ तिकट मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचे पीठ साखर एकत्रित करून आहार नवीन ठेकेदार नवीन कंपनीस दिला आहे.

नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील बिटला पोहोच करण्यात आला. काही लाभार्थ्यांनी आहार घरी घेवून गेल्यावर येथील कृषिनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून येथील लाभार्थी माझी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला होता व ते पॅकिंग फोडलं आसता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला, हाच मुद्दा विश्वजीत कदम यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com