Thane Hospital News: नातेवाईकांचा आक्रोश! ठाण्यातील रुग्णालयात ४ वर्षाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू...प्रशासनाने केले हात वर

ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
Thane Hospital News
Thane Hospital NewsEsakal
Updated on

ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात 17 रुग्णांचा काल रात्री मृत्यू झाला. एकाच रात्रीत 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या 22 वर गेली आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली. रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे हे रुग्ण दगावल्याचे सांगितले जात आहे.

ठाण्यातील कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्ण दगावले आहेत. या मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा मोठा आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्यानेच त्यांचा मृत्यू ओढवल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

तर एका ४ वर्षाच्या बाळाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळाच्या नातेवाईकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. शाहापूर रुग्णालयातून मंगळवारी या बाळाला शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या लहान बाळाने केरोसीन पिलेलं होतं. त्यामुळे त्याला इन्फेक्शन झालं होतं असं येथील डॉक्टरांनी सांगितलं. ५ दिवसांपासून बाळाला या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

Thane Hospital News
ठाण्यातील धक्कादायक घटना! छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू

बाळाला या रूग्णालयात आणलं तेव्हा त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. या व्यतिरीक्त दुसरं काही सांगण्यात आलं नव्हतं, बाकी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती असं बाळाच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे. तर गेल्या आठवड्याभरापासून रूग्णालयाचा भोंगळ कारभार चालला असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. बाळाचे नातेवाईक 'टिव्ही ९ मराठी' शी बोलत होते.

Thane Hospital News
Devendra Fadanvis: अजित पवार- शरद पवारांच्या गुप्त बैठकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,'या भेटीबाबत मला...'

या घटनेला कोणाला जबाबदार धरावं, असा प्रश्न असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. तर रुग्णालयातील अधिकारी सांगतात, स्टाफ कमी आहे. तर जेव्हा मी माझ्या पेंशटची चौकशी करण्यासाठी जातो तेव्हा त्यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात येत की, तुम्ही त्याच्या वडिलांकडून (बाळाच्या वडिलांकडून) माहिती घ्या. तो माणूस अडाणी आहे, मी त्याकडून काय माहिती घेऊ, असा प्रश्न नातेवाईकांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

तर नातेवाईक सांगतात जेव्हा बाळाचा मृत्यू झाला तेव्हा त्याठिकाणी डॉक्टर नव्हते, तर डॉक्टर सांगतात आम्ही तिथे उपस्थित होतो, याची जबाबदारी कोण घेणार असंही मृत बाळाच्या नातेवाईकांनी म्हंटले आहे.

Thane Hospital News
PM मोदींविरोधात अर्वाच्च भाषेत बोलणं भोवलं! सचिन बनसोडे यांच्यासह 150 अज्ञातांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.