बारामती : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळं (Samruddhi Mahamarg Bus Accident) बारामतीतील काळे कुटुंबीयांवर देखील शोककळा पसरली आहे.
येथील अॅड. अमर काळे यांची बहीण कांचन गंगावणे (वय 38), त्यांचे पती कैलास गंगावणे (वय 48) व सई गंगावणे (वय 20) या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पहाटे आल्यानंतर काळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता, त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला.
साई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता व ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर व बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी शोध सुरू केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील कुमार मुसळे यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघाताबाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीनं माहिती घेतली.
नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघात स्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षापर्यंत पोलीस आलेले आहेत. दरम्यान, काळे कुटुंबीयांनी गंगावणे कुटुंबीय याच बसमधून प्रवास करत होते या वृत्तास दुजोरा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.