Deulgaon Tad in Bhokardan
Deulgaon Tad in Bhokardanesakal

मोठी बातमी! शिक्षणात मराठा आरक्षण नसल्यामुळं 18 वर्षाच्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन

शिवानीचे शिक्षण हे आत्तापर्यंत मामांनी केलं. यापुढेही तिला खूप शिकायची इच्छा होती.
Published on
Summary

मराठा आरक्षण (Maratha Reservation) असते तर खर्च कमी लागला असता, या विचारातून तिने एका चिठ्ठीद्वारे आपल्या भावना व्यक्त करत विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड (Deulgaon Tad in Bhokardan) येथील शिवानी संजय हिवाळे (वय 18) ही युवती बारावीत 72 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. परंतु, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च तिला पेलवत नव्हता.

या शिवाय, मराठा आरक्षण (Maratha Reservation) असते तर खर्च कमी लागला असता, या विचारातून तिने एका चिठ्ठीद्वारे आपल्या भावना व्यक्त करत विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना बुधवारी सायंकाळी देऊळगाव ताड (ता. भोकरदन) येथे घडली.

Deulgaon Tad in Bhokardan
गो रक्षक बनले भक्षक? घोळ गणपती मंदिर परिसरात 30 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या

शिवानीचे शिक्षण हे आत्तापर्यंत मामांनी केलं. यापुढेही तिला खूप शिकायची इच्छा होती. तिला बी.ए.च्या प्रथम वर्षात प्रवेशही घ्यायचा होता. परंतु, हलाखीच्या परिस्थितीमुळे आणि त्यात मराठा आरक्षण नाही. या विचाराने तिने चिठ्ठी लिहून आपल्या भावना व्यक्त करत जीवन संपवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.