Shivsena: विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची शेवटची संधी... CJI चंद्रचूड यांनी दिली 30 ऑक्टोबरची नवी मुदत

विधानसभा अध्यक्ष यांना 30 ऑक्टोबर ही शेवटची संधी देण्यात आली आहे.
shinde vs thackeray case rahul narvekar dhananjay chandrachud supreme court maharashtra politics
shinde vs thackeray case rahul narvekar dhananjay chandrachud supreme court maharashtra politicssakal
Updated on

सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत असमाधानी आहोत. सॉलिस्टर जनरल यांनी दसऱ्याच्या सुट्टी दरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करावी आणि सुधारीत वेळापत्रक द्यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना नवे वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबर ही शेवटची संधी देण्यात आली आहे. ३० तारखेला विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक सादर करावे लागेल असे न्यायालयाने म्हटलं आहे.

यावेळी विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिली जात आहे. या दसऱ्याच्या सुट्टीत सॉलिस्टर जनरल अॅड. तुषार मेहता यांच्यासोबत बसून विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक बनवावे. पुढील सुनावणीपर्यंत हे वेळापत्रक आलं नाही तर कोर्ट स्वत: वेळापत्रक देईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

shinde vs thackeray case rahul narvekar dhananjay chandrachud supreme court maharashtra politics
MPSC Exam: एकाच दिवशी तीन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप ; परीक्षांच्या तारखा बदला ! आमदार सत्यजीत तांबेंची मागणी

आजही न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. 'अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबद्दल आम्ही समाधानी नाही', असं न्यायालयाने म्हटलं आहे.

आजच्या या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब, अनिल देसाईही उपस्थित होते.

तुम्ही निर्णय घेत नसाल, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल : सर्वोच्च न्यायालय

तुम्ही जर यावेळी ठोस वेळापत्रक देत नसाल, यासंदर्भातील याचिका निकाली काढत नसाल, तर आम्हाला नाईलाजाने यामध्ये दखल द्यावी लागेल, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

shinde vs thackeray case rahul narvekar dhananjay chandrachud supreme court maharashtra politics
Same Sex Marriage Explainer : 'समलैंगिक विवाहा'ला मान्यता कशी देणार, पाच न्यायधीशांच्या खंडपीठाचे म्हणणे काय?

आता या प्रकरणाची सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्या दिवशी विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक द्यावं, अन्यथा आम्हाला नाईलाजाने यामध्ये दखल द्यावी लागेल, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

shinde vs thackeray case rahul narvekar dhananjay chandrachud supreme court maharashtra politics
Shivsena: ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं! शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.