CM Face of Mahayuti:"भाजप बेस गमावत आहे, शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करा," मंत्र्याच्या दाव्याने महायुतीत राजकारण पेटणार

CM Eknath Shinde: महायुतीत भाजपकडे सर्वाधिक जागा असूनही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सरकाचे नेतृत्त्व सोपवले आहे.
 CM Face of Mahayuti
CM Face of MahayutiEsakal
Updated on

Declare Eknath Shinde As CM Face of Mahayuti Demands Shiv Sena Minister:

राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीचे सरकार आहे. या महायुतीत भाजपकडे सर्वाधिक जागा असूनही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सरकाचे नेतृत्त्व सोपवले आहे. आता येत्या निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांच्याकडे महायुतीचे नेृतृत्त्व असावे म्हणून शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत.

दरम्यान शिवसेनेच्या एका मंत्र्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर दावा केला आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढत आहे. तर भाजप आपला बेस गमावत आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत जास्त जागा द्याव्यात. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.