मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. यातच पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांना शिवसंवाद यात्रेमधून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्यावर टीकेची झोड उठवतान दिसत आहेत. यादरम्यान या पार्श्वभूमिवर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आज पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
केसरकर म्हणाले की, राज्याला शांतता पाहिजे,आमचं २०१४ साली सरकार स्थापन झालं तेव्हा रोज सकाळी प्रेस कॉन्फरन्स होत घेऊन दिल्लीतील केंद्र सरकारवर टीका होत असे, आणि इथं राज्य सुरळीत चालावं अशी तुमची अपेक्षा होती. रोज सकाळी ९ वाजता कोण बोलतं, ते महाराष्ट्राला माहिती होतं, असे नाव न घेता केसरकरांनी संजय राऊतांवर टीका केली.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जी परिस्थीती निर्माण झाली आहे, त्यामध्ये कालपर्यंत तुम्ही सांगत होता की, शेतकऱ्यांच्या बांधावर चला, मग आज त्यांचे कार्यकर्ते नुकसानीचे पंचनामे करण्यात का मदत करत नाहीयेत? असा सवाल केसरकरांनी यावेळी केला. त्याऐवजी महाराष्ट्रात राजकारण चाललं आहे, हिणवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप केसरकरांनी केला आहे.
शिवसैनिकांकडून कोल्हापूरात धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला यावर बोलताना केसरकर म्हणाले की, खासदारांच्या घरावर मोर्चा काढला, कोणी आधिकार दिला कोणाच्या घरावर जाण्याचा. तुम्हाला हवं असेल तर सभा घ्या. जणतेशा काय बोलायचं ते बोला. पण असे नेत्यांना हिणावणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, जो प्रवक्त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा सुधार आला होता ते पुन्हा एकदा घसरताना दिसत आहे, असे केसरकर म्हणाले.
केसरकरांनी आदित्य ठाकरेंच्या विधानाचा देखील समाचार घेताला, आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरी झाली त्यामुळं ही गद्दारी असल्याचं म्हटलं होतं, त्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, "तुम्ही अमुक व्हालं, तुम्ही लोकांच्या अश्रूंमध्ये... लोकांना रडवायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे. खोटं सांगून रडवता येतं. असं सांगून रडवता येतं की, ज्यावेळी पक्षप्रमुख आजारी होते तेव्हा कटकारस्थान झालं असं तुम्ही म्हणू शकता.. पणध कटकारस्थान मुळात झालंच नव्हतं हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलं पाहीजे", असं केसरकर यांनी म्हटलं.
"कटकारस्थान का होणार? तुम्हाला परत-परत भेटत होते. सांगत होते आघाडी तोडा. त्यामध्ये काही कटकारस्थान असतं का? शिवसेना वाचली पाहिजे तर ही आघाडी बनता कामा नये. तुमची जर बोलणी चालू होती आणि तुम्हाला वाटतं की मुंबई शिवसेनेचं ऱ्हदय आहे, मग मोदींशी बोलणी का केली नाही. ही बोलणी करुन मुंबईवर शिवसेनेचा झेंडा कायम ठेवू शकला असतात", असे केसरकर यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.