Narayan Rane: अखेर नारायण राणे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल

संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी नारायण राणेंना फेब्रुवारीमध्ये कायदेशीर नोटीस पाठवली होती
 defamation suit against Narayan Rane in Mulund Court
defamation suit against Narayan Rane in Mulund Court
Updated on

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी मुलुंड न्यायालयात नारायण राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ( defamation suit against Narayan Rane in Mulund Court )

संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशीर नोटीस पाठवली होती. राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचा दावा सिद्ध करावा असं या नोटीसीमध्ये राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी अखेर नारायण राणे यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

 defamation suit against Narayan Rane in Mulund Court
Gautam Adani: शरद पवार- गौतम अदानी भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

नेमकं काय आहे प्रकरण?

आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेवर निवडूण आणण्यासाठी मी खर्च केला होता. संजय राऊत यांचं मतदार यादीत नावही नव्हतं, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. दरम्यान या प्रकरणात संजय राऊत यांनी नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशईर नोटीस पाठवली होती.

 defamation suit against Narayan Rane in Mulund Court
Serum Institute: नागपूर खंडपीठाचा अदर पूनावाला यांना धक्का; बजावली नोटीस

राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचा दावा सिद्ध करावा असं या नोटीसीमध्ये राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी अखेर राणेंविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.