उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७०० कोटी रुपये खर्च करून पंढरपूरचा विकास केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तथापि, हजारो नागरिकांची घरे आणि दुकाने उद्वस्थ करणाऱ्या प्रस्तावित आराखड्याला पंढरपूरकरांचा विरोध आहे. आमचा विकासाला विरोध नाही. पाडापाडी न करता विकास कामे कशी करता येतील हे सुचविणारा विकास आराखडा आम्ही शासनाला सादर केला होता. (Latest Marathi News)
परंतु शासनाने त्या विषयीची भूमिका स्पष्ट केलेली नाही. आषाढीच्या महापूजेआधी कशा पद्धतीने विकास करणार आहे, हे शासनाने जाहीर करावे अन्यथा यात्रेकरुंशी संवाद साधून, अब ही बार नो शिंदे-फडणवीस सरकार असा नारा देऊ, असा इशारा तीर्थक्षेत्र बचाव समितीचे सचिव रामकृष्ण महाराज वीर यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
येथील होळकर वाड्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. वीर यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कॉरिडॉरच्या नावाखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरासह हजारो नागरिकांची घरे, मठ आणि दुकाने पाडली जाणार आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबे अडचणीत येणार असल्याने पंढरपूरमधील हजारो नागरिकांनी कॉरि़डॉरला विरोध दर्शविलेला आहे.(Latest Marathi News)
आमचा विकासाला विरोध नाही. परंतु, पाडापाडी न करता विकास कसा करता येईल, या विषयी आम्ही वेगळा आराखडा तयार करून शासनाला सादर केलेला आहे. तथापि आमच्या कोणत्या सूचनांची दखल घेतली याची शासनाकडून अद्याप माहिती दिली गेलेली नाही. केवळ विश्वासात घेऊन कामे केली जातील एवढेच सांगितले जात आहे.(Latest Marathi News)
दरम्यान, आषाढी एकादशीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन केले जाणार असून यात्रेनंतर लगेच पाडापाडी सुरू केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक नागरिक भयभीत होऊन हवालदिल झाले आहेत. मुख्यमंत्री नेमके कोणत्या कामांचे भूमिपूजन करणार आहेत.
हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला येण्याआधी पंढरपूरमध्ये कोणती विकास कामे केली जाणार आहेत हे जाहीर करावे. अन्यथा आम्ही आषाढीला मुख्यमंत्र्यांना अडवणे अथवा काळे झेंडे दाखवणे, असे प्रकार न करता यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याशी संवाद साधून, अब की बार नो शिंदे-फडणवीस सरकार असा नारा देणार आहोत. आज आम्ही पंढरपूरकर संकटात आहोत. (Latest Marathi News)
उद्या तुम्ही संकटात येऊ शकता. त्यामुळे पुन्हा असे सरकार आणू नका असे आवाहन आम्ही यात्रेकरूंना करणार आहोत. शासनाने आम्हाला यात्रेपूर्वी सविस्तर माहिती दिली तर आम्ही आमची भूमिका बदलू असेही श्री. वीर महाराज यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नाना कवठेकर, माजी नगरसेवक शैलेश बडवे, आदित्य फत्तेपूरकर, ऋषिकेश उत्पात, श्रीकांत महाराज हरिदास, भागवत महाराज बडवे, माऊली सूर्यवंशी, गणेश लंके, गजानन भिंगे, श्री. बिडवे, ॲड. उंडाळे यांच्यासह पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि संतभूमी बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.