पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात कबड्डीपटू असलेल्या अल्पवयीन मुलीची कबड्डीचा सराव करतानाच हत्या (Pune minor girl murder) केली. या घटनेमुळे पुणे हादरले असून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे'' असं अजित पवार म्हणाले.
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. तसेच ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे.
नेमकी काय आहे घटना?
सदर मुलगी ही आठवीत शिकत होती. ती कबड्डीपटू असल्याने नेहमी कबड्डीचा सराव करत होती. मंगळवारी देखील आपल्या मैत्रिणींसोबत बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स येथे सराव करताना आरोपी शुभमसह दोन साथीदार तेथे आले. सराव करतानाच तिला बाहेर ओढले. तिच्या गळ्यावर वार केले. त्याच्या मित्रांनी देखील तिच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये तिचे शीर धडापासून वेगळे झाले. दरम्यान, आरोपी हा तिचा दूरचा नातेवाईक असून एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.