Devendra Fadanvis: PFIवरील बंदीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले...

पीएफआय हा एक सायलेंट किलर होता
Devendra Fadanvis: PFIवरील बंदीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले...
Updated on

पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या संघटनेवर आता केंद्र सरकारने 5 वर्षासाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले होते. यावर प्रतिक्रिया देताना पीएफआयवर घातलेली बंद योग्य असून महाराष्ट्रातही आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आपल्याला माहिती आहे की लोक दहशत वादी कृत्य करून देशाचे वातावरण बिघडवत आहेत. त्याचबरोबर काही लोक देशात तेढ निर्माण करण्याचे काम करत होते. त्यामध्ये पीएफआय देखील होते. पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. पीएफआयशी संबधित इतर 6 संस्थांवरही बंदी घातली आहे. या संस्थांचे आणखी काही कनेक्शन आहेत का ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर बाकी त्यांच्या संस्थांचा इतर संस्थांशी संबंध आहे का? किंवा पैशाचे काही व्यवहार झाले आहेत ते कोणत्या खात्यातून झाले आहेत हे सर्व पडताळून पहिले जाईल त्यानंतरही दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री पुढे म्हणालेत.

देशातून सर्वात आधी केरळने पीएफआय संघटनेवर बंदी घाला अशी मागणी केली होती त्यानंतर विविध राज्यातून ही मागणी झाली होती. पीएफआय संबधी सर्व गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत यामुळे केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दरम्यान राज्यात देखील या लोकांनी विविध ठिकाणी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता असंही फडणवीस म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.