Devendra Fadnavis : गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला सर्वात जास्त राजकीय धक्के देणारे व्यक्ती म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपमध्ये चाणाक्य म्हणून ओळख आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनपेक्षित सरकार स्थापन केले.
मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले फडणवीस यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, यावर देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात भाष्य केले.
अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का?, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "२०२४ पर्यंतचे सर्व आश्चर्य संपले आहेत. शिंदे आणि आम्ही २४ मध्ये अनेक राजकीय धक्के आम्ही देऊ. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची ग्रोथ थांबली होती. ती ग्रोथ आम्हाला वाढवायची आहे. सरकारवर आम्हाला लक्ष ठेवायचे आहे."
शिवसेनेत मोठा बंड केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. मात्र ते झाले नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री होणार नाहीत हे आधी माहित असतं तर एवढं मोठ प्रकरण घडवून आणलं असतं का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पहिल्यांदा हे सर्व जुळलं यासाठी मी उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद देईल. त्यांनी ती परिस्थिती निर्माण केली नसती तर आमदार नाराज झाले नसते. ते आमच्यासोबत आले नसते."
उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी मोतोश्रीचे दरवाजे बंद केले. ते माझा कॉल देखील घेत नव्हते, अशी खंत देखील फडणवीस यांनी बोलून दाखवली.
मला पहिल्या दिवसापासून माहित होतं की मी मुख्यमंत्री होणार नाही. पण मला शेवटच्या क्षणी कळालं की उपमुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्री होणार नाही मला त्याची अडचण नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी लिड करत होतो. मी मुख्यमंत्री पद घेत नाही, असा निर्णय मी वरीष्ठांना सांगितला होता. तेव्हा मला त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले. मी ते आदेश स्विकारले, असे फडणवीस म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.