Devendra Fadanvis: उलट केंद्र सरकारचे आभार मानायला हवेत; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadanvis
Devendra Fadanvisesakal
Updated on

मुंबईः महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब म्हणून विकसित करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्राने महाराष्ट्राला दिलेली ही भेट आहे. त्यामुळे केंद्र सरकराचे आभार मानायला हवेत, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पांवरुन देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. फडणवीस म्हणाले की, नवी वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्स्टाईल पार्क देणार आहे. त्यामुळे राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर तयार होईल. यासंबंधीचं प्रजोजल अंतिम टप्प्यात असून नवी वर्षांमध्ये त्यासंदर्भात घोषणा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला, मंत्री जेलमध्ये गेले. त्यामुळे महाराष्ट्रात कुणीही यायला तयार नव्हतं. महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचं काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना कॅबिनेटने मान्यता दिली आहे. एका मीटिंगमध्ये आम्ही ते मंजूर केले आहेत.

याशिवाय गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. यामध्ये ७५ टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या कंपन्यांचा आहे. १ लाख थेट रोजगार, ५ लाखांपर्यंत इतर रोजगार. ही रिफायनरी केरळला जाणार असल्याचं बोललं जात असलं तरी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे आमचं पाप नाही- फडणवीस

फॉक्सकॉचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही, असं तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं होतं. परंतु प्रत्यक्षात तो गेला तेव्हा त्यांनी आमच्या सरकारच्या काळात गेल्याची भूमिका घेतली. असा पहिला फेक नरेटिव्ह त्यांनी तयार केला.

त्यानंतर गेलेल्या टाटा एअरबसबद्दल बोलतांना ते म्हणाले की, २३ सप्टेंबर २०२१ रोजी हा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. १४ फेब्रुवारीचीही बातमी फडणवीसांनी यावेळी दाखवली. यामध्ये प्रकल्प गुजरातल्या गेल्याचं सांगण्यात आलेलं होतं. हा प्रकल्प नागपूरला राहावा, यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु महाविकास आघाडीचं सरकार असतानाच प्रकल्प गुजरातला गेल्याचं फडणवीस म्हणाले.

'मेडिकल डिव्हाईस पार्क' आणि 'बल्क ड्रग पार्क'

''काल राज्याबाहेर गेलेल्या सॅफ्रनबद्दलही त्यांनी भूमिका मांडली. हा प्रकल्प २०२१मध्येच हैदराबादला गेला. तेव्हा 'मविआ'चं सरकार होतं. आता तो प्रकल्प हैदराबादमध्ये उभादेखील राहिला आहे. तरीही आमच्यावर विनाकारण खापर फोडलं जात आहे.''

'मेडिकल डिव्हाईस पार्क' आणि 'बल्क ड्रग पार्क' देण्याचं केंद्राने कधीही सांगितलं नव्हतं. तरीही केंद्र सरकारला आणि पंतप्रधान मोदींना दोष दिला जात आहे. मात्र हे क्लस्टर महाराष्ट्रात कधीच आले नव्हते, अशी स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी मांडली.

हे सगळे प्रकल्प आमच्या सरकारमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं पाप आमच्या माथी मारु नका, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.