Devendra Fadanvis: वर्षा बंगल्यावर काल रात्री झालेल्या बैठकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'मुख्यमंत्री आणि..'

शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या आसपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. अशातच काल(शनिवारी) रात्री 10 वाजण्याच्या आसपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले होते. या तीनही नेत्यांमध्ये ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक दोन तास चालली आहे. तर या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तसेच कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशातच या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadanvis
Diva Railway Station: कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्या...प्रवाशांचा संताप, 40 मिनिटे रेलरोको; दिवा रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली तर काय नवल आहे'. दरम्यान या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तसेच कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis: रात्री वर्षा बंगल्यावरील खलबतांनंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; काय आहे कारण?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि दुर्गप्रेमी यांच्या सहभागातून 1 आणि 2 ऑक्टोबरला गडकिल्ले परिसर स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Devendra Fadanvis
Maharashtra Politics: राजकीय घडामोडींना वेग! रात्री मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची ‘वर्षा’वर दोन तास बैठक, कशावर झाली चर्चा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.