Devendra Fadnavis: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी भेटीवर ते म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे.
केजरीवाल आणि उद्धव ठाकरे भेट होवून त्यांना एकमेकांची गरज लागतेय, म्हणजे भाजपला पराभूत करण्याकरिता केजरीवाल कोणाशी ही हात मिळवणी करण्यासाठी तयार आहेत आणि उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत.
यातूनच भाजपची ताकत दिसत आहे. मात्र २०१९ साली यांनी हा प्रयोग करून पाहिला आहे, हा कधीही यशस्वी झाला नाही आणि होणार देखील नाही. अशी खोचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
'जलयुक्त शिवार'च्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात" महत्वाची माहिती
तर जलयुक्त शिवारवर बोलताना फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला.
जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली यावी हे, ध्येय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या बैठकीत प्रत्येत जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व जिल्हे आता काम करणार आहेत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला देखील गती देण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार एक मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लिडरशीप घेतली आणि त्यातून गावात जागृती निर्माण झाली. तशीच लिजरशीप जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.