नागपूरः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. ते नुसते दौऱ्यावर नाहीत तर प्रत्येक तालुका पिंजून काढणार आहेत. त्यांनीच याबाबत माहिती दिली.
कर्नाटकमध्ये भाजपला काँग्रेसने धूळ चारली, मागे झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे तयार झालेलं वातावरण; या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याला विशेष राजकीय अर्थ आहे.
नागपूरमध्ये भाजपविरोधी लाट तयार होत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे जागं झालेल्या फडणवीसांनी विशिष्ट प्रकारचा नागपूर दौरा आखला आहे. त्यामध्ये ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि तालुका पिंजून काढतील.
या दौऱ्यामध्ये आपण शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी बोलतांना सांगितलं. ते म्हणाले की, दोन दिवसांमध्ये चार मतदारसंघ पूर्ण होतील. इतरही दोन मतदारसंघ त्यानंतर पूर्ण करु. जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघात जावून आढावा घेणार असून सगळे तालुके आणि सगळ्या नगर पालिका कव्हर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
'सरकारच्या योजना इफेक्टिव्हली सामान्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी आपण प्रयत्न करत आहोत' असं म्हणून त्यांनी फक्त सावनेर आणि काटोलच नाही तर सहाही मतदारसंघात फिरणार असल्याचं सांगितलं.
काल व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपसंदर्भात बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपमध्ये मंत्री बनायला पैसे लागत नाहीत. अशा लोकांना आम्ही ट्रॅप केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.