पुणे : अजित पवार (Ajit pawar) यांच्या अडचणीत सध्या वाढ होत असल्याचे चित्र दिसत असून काल (ता.७) निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाचा छापेमारी झाल्याची बातमी समोर आली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. दरम्यान आज(ता.८) पुण्याच्या कासारसाई धरणाच्या (kasarsai dam) पाण्यात मधोमध पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अडकल्याची घटना घडली... काय घडले नेमके?
...अन् भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले!
पुण्याच्या मावळ तालुक्यात कासारसाई धरण आहे. तिथं बऱ्यापैकी मत्स्यव्यवसाय सुरू आहे. त्याचीच माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच पोहोचले होते. धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता. तिथं जाण्यासाठी तराफा अथवा बोटीच्या साहाय्याने जायचं होतं. संबंधित मालकांनी पवार यांना तराफ्यावर घेऊन जायचं नियोजन आखलं होतं. गाडीतून अजित पवार उतरताच त्यांना याची कल्पना देण्यात आली.
इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत
तेव्हाच गरजेपेक्षा जास्तीचे लोक त्यावर घेऊ नका, अशी सूचना त्यांनी केली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि तराफ्यावरचं वजन जास्त झाल्याने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता. पाहणी झाल्यानंतर जेव्हा ते परतले, तेव्हा त्यांनी घडल्या प्रकारावर मिश्किल टिप्पणीही केली. इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत आहे, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.