Ajit Pawar: दादाचा वादा! राजकारणात आल्यापासून कधीही पक्ष बदलला नाही; उपमुख्यमंत्र्यांचा जनतेला महत्त्वाचा संदेश; Video

Ajit Pawar message to Maharashtra :अजित पवारांकडून सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात त्यांनी बजेटमधील घोषणांचा पुनरुच्चार केला आणि विरोधकांवर निशाणा साधला.
ajit pawar
ajit pawar

मुंबई- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याच्या १३ कोटी जनतेला महत्त्वाचा संदेश दिला आहे. अजित पवारांकडून सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात त्यांनी बजेटमधील घोषणांचा पुनरुच्चार केला आणि विरोधकांवर निशाणा साधला. राजकीय जीवनात कधीही पक्ष बदललेला नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो. मागे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण, कोणताही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार व्हिडिओमध्ये म्हणतात की, महाराष्ट्र वासियांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी मी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभले. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गंत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये येणार आहेत. यासाठी ४६ हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले आहेत.

ajit pawar
Lonavala Accident : भुशी दुर्घटनेतील कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत;अजित पवार,दुर्घटना रोखण्यासाठी फलक

मुलांपेक्षा मुलींकडे दुर्लक्ष होतं. पण, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माता-भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील. दैनंदिन गरजांसाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही अशी भावना महिलांमध्ये निर्माण होईल. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे असं मला वाटतं, असं पवार म्हणाले.

ajit pawar
Ajit Pawar : सार्वजनिक कामांसाठी मिळणार विनामूल्य जमीन;अजित पवार यांची सूचना,शेती महामंडळाकडे प्रस्ताव देण्याचे आवाहन

आमच्या सरकारने अनुभवाच्या जोरावर अशक्य वाटणारे काम शक्य करू दाखवलं आहे. अर्थसंकल्पात २५ हजार नव्या उद्योगांच्या उभारणीसाठी तरतूद करण्यात आली आहे. महिलांना पिंक रिक्षा चालवण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. तरुण-तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि १० हजार ˈस्टाइपेन्ड् देण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.

वारकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ' स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, विरोधकांमध्ये नकारात्मकता भरली आहे. त्यांच्यात आणि तुमच्या दादात हाच फरक आहे. ते राजकारण करतात पण, तुमचा दादा काम करणारा आहे, असं पवार म्हणालेत.

जे लोक बजेटच्या नावाने बोटं मोडत आहेत. त्यांचे चेहरे नीट पाहून या. यांना लोकांना सरकारी लाभापासून दूर ठेवायचं आहे. वर्षभरात तीन सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते मला शिव्याशाप देत आहेत. मी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. पण, विरोधकांना हे सहन होत नाही, त्यामुळे मला शिव्या दिल्या जात आहेत, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com