Ajit Pawar in Gadchiroli : मोदींपासून शिंदेंचे कौतुक! अजित पवारांच्या पहिल्या दौऱ्यात काय घडलं?

Deputy CM Ajit Pawar: शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम शनिवारी (दिं.८ जुलै) गडचिरोली येथे पार पडला. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

Ajit Pawar with Eknath Shinde : 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम शनिवारी (दिं.८ जुलै) गडचिरोली येथे पार पडला. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता. यावेळी अजित पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

यावेळी ते म्हणाले की नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम ९ वर्षांपासून देशाच्या सर्वांगिन विकासासाठी काम करत आहे. कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकराने मंजूरी दिलेल्या अनेक विकासकामांवर प्रकाश टाकला.

'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी गडचिरोलीमध्ये केलेल्या विकासकामांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी झालेली कामे आणि नियोजित कामांबद्दल माहिती दिली. गडचिरोलीमध्ये विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. गडचिरोलीतील तरुणांच्या रोजगारासाठी विमानतळ गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसरकारकडून गडचिरोलीसाठी मंजूर केलेले प्रकल्प:

१. गडचिरोलीत विमानतळ बांधण्याचा निर्णय.

२. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्याचा राज्यसरकारचा निर्णय.

३. गडचिरोलीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता.

४. पोलिसांसाठी विशेष उपचार रुग्णालय बांधण्याचा निर्णय.

५. भामरागड तालुक्यात पुलांच्या निर्मीतीसाठी २०० कोटी रुपयांची मंजूरी.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar : ''असं असेल तर मी राजकारण सोडतो'' आव्हाडांनी अजित पवारांना खिंडीत गाठलं

गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य सरकारने आणि अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम केलेल पाहिजे यावर अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की,"राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीत येतात. सचिवांनी देखील गडचिरोलीचे दौरे केले पाहिजे."

अधिकाऱ्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की,"अधिराकाऱ्यांनी मुख्यालयात राहिलं पाहिजे. गडचिरोलीला ज्यावेळी तुमची नेमणूक होते, तेव्हा नागपूरमध्ये न राहता गडचिरोलीला राहिलं तर त्या भागातील लोकांना जास्त मदत होईल." यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशंसा करत म्हणाले की एकनाथ शिंदे एकमेव मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी गडचिरोलीमध्ये येऊन मुक्काम केला.

Ajit Pawar
NCP Ajit Pawar : नरडाण्यात शरद पवार समर्थकांचे आंदोलन; अजित पवारांचा निषेध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.