Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Deputy Chief Minister Devendra Fadnavisसकाळ

भाजप कार्यकारिणीत शिंदेंचं कौतुक; काय म्हणाले फडणवीस वाचा

Published on

पनवेल : भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेल येथे पार पडत आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राच्या रयतेचं राज्य आल्यानंतर भाजपची पहिली कार्यकारिणी रायगड जिल्ह्यात होत आहे याचा मला अभिमान आहे असं फडणवीस बोलताना म्हणाले आहेत. राज्यातील सत्तेचा गड आपण जरी जिंकलो असलो तरी मोदींनी विकासाची जी यात्रा सुरू केली आहे त्या यात्रेतील गड जिंकल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही. हे सरकार यावं ही तर श्रींची इच्छा... हे सरकार यावं ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती असं देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना म्हणाले आहेत.

(Devendra Fadnavis News)

Deputy Chief Minister Devendra Fadnavis
"...म्हणून मी पाकिस्तानला लाथ मारून भारतात आलो" - अबू आझमी स्पष्टच बोलले

"गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीने सूडाचं राजकारण केलं आहे. हे वर्षे खूप संघर्षाचे गेले आणि या अडीत वर्षात महाराष्ट्र खूप मागे गेला, प्रगतीची सर्व कामे थांबली गेली, केंद्राने कोट्यावधी रूपये दिली ते काम मागच्या सरकारने बंद केले पण सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही.. त्यामुळे राज्यात हे सत्तांतर झाले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे." असा दावा फडणवीसांनी केला.

"राज्यात पहिल्यांदाच सत्तेतील ४० आमदार सत्ता सोडून विरोधी पक्षात येत आहेत. कारण त्यांना माहिती होतं की आपण येथे राहिलो तर संपणार आहोत. कारण ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागत होतं हे त्यांना कळलं होतं आणि सरकारमधून मावळे बाहेर पडले. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून अभिनंदन करतो. आता आमच्यासोबत जे आले तीच खरी शिवसेना आहे." असं मत फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis
"चंद्रकांत पाटलांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न"

निवडणुकांत जनतेनं ज्यांना निवडून दिलं होतं त्यापैकी काहीजण बाहेर गेले होते पण आता पुन्हा तेच सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे आता हे सरकार खरं जनतेन निवडून दिलेलं सरकार आहे असं म्हणता येईल. या सरकारने याकाळात अनेक समाजाच्या हिताचे निर्णय घेतले असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

मला नेत्यांनी सेनापती बनवलं आणि माझ्यामाहे भक्कमपणे उभे राहिले आणि हे जनतेचं सरकार स्थापन झालं. मला जेष्ठांनी मला उपमुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला लावली हा माझा सन्मान आहे. मला सरकारमध्ये राहून सरकार चालवा असं त्यांनी सांगितलं. आता मागच्या अडीच वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()