डोंबिवली : राजकारणात आरोप प्रत्यारोप (Political criticizes) होत असताना भाषेचे स्तर खालावत चालले आहेत. सार्वभौम सभागृहात देखील सदस्यांचे बोलणे, वागणे योग्य नसल्याने काहींवर निलंबणाची कारवाई (suspension action) केली गेली. सर्वोच्च न्यायालयाला (supreme court) यामध्ये पडावे लागले. हे योग्य नसून असेच सुरु राहीले तर सभागृहाचे सर्व अधिकार एक दिवस संपुष्टात येतील असे विधान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी कल्याण येथे केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या असून सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीनेही कल्याण डोंबिवलीत आपले जुने स्थान पुन्हा निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रविवारी गोळवली येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वंडार पाटील, रमेश हनमंते, युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना विधासभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी वरील विधान केले. ते म्हणाले, यंदा सभागृहात केवळ सहा दिवस सेशन चालतं, मात्र त्यातही एखादा विधायक प्रश्न उपस्थित झाला की मागचं काही तरी काढून सभागृहाचा वेळ वाया घालवण्यात येतो. यामध्ये प्रत्येक मिनिटाला जनतेचे पैसे खर्च होत असतात याची खंत वाटते, याचा सर्वच पक्षाने केला पाहीजे असे ते म्हणाले.
सभागृहातील सदस्यांनी योग्य वर्तन करावे, न्यायालयाचा सभागृहाचा अवमान कोठेही होऊ नये यासाठी लवकरच सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून संविधानिक शब्दांचा वापर झाला पाहीजे याविषयी सुचना करणार असल्याचे झिरवळ यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचून काम करावे असे सांगितले. तसेच अनेक मार्गदर्शक सुचना देखील यावेळी झिरवळ यांनी कार्यकर्त्यांना केल्या.तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांना परिसरातील युवकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला.
प्रगल्भ माणसाने असे काही बोलणे अपेक्षित नाही - जितेंद्र आव्हाड
ठाणे येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न केलेल्या कामांचे श्रेय देखील काही लोक लाटतात यावर विधान केले होते. याविषयी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असे काही तरी बोलावे हे अपेक्षित नाही. ठाण्यात श्रेयवादाची लढाई आहे असे मला कधीही दिसले नाही. कार्यकर्त्यांचा हुरुप वाढविण्यासाठी राजकारणात असे बोलावे लागते असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.