नांदेडमध्ये पैनगंगा नदीमध्ये बुडून ३ मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या मुली आपल्या कुटुंबीयांसोबत सहलीसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्या आहेत. या मुलींचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणीनगर प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांनी घेतलेली लाच जप्त करण्यात आली आहे.
पुणे कार अपघात प्रकरण आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना गुन्हे शाखेत आणण्यात आले. कार अपघात प्रकरणी चालक अपहरण प्रकरणातील आरोपी पित्याला पुणे जिल्हा न्यायालयाने ताब्यात घेण्याची परवानगी दिल्यानंतर तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
मुंबईचा कोस्टल रोडला गळती लागल्याची घटना समोर आली आहे. पावसाळ्याआधीच कोस्टल रोडला गळती लागली आहे. कोस्टल रोडला गळती लागल्याचा हा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो व्हायरल होत आहे. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी हा मार्ग मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. पण अवघ्या काही दिवसांमध्येच कोस्टल रोडला गळती लागल्याचे चित्र आहे.
कल्याणीनगर प्रकरणात अटक झालेल्या डॉ. अजय तावरेंचा फोन पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. त्यांना कोणाचा फोन आला होता, त्याबाबतचे सर्व रेकॉर्ड तपासले जाणार आहेत.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे. आज दुपारी पोलिसांना हा फोन आला, अशी माहिती मिळत आहे.
गुजरातमधील राजकोट येथे झालेल्या दुर्घटनेनंतर राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी ब्रिजेश कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिल्लीतील भालस्वा डेअरी परिसरात एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
आप खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणातील आरोपी आणि अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा जामीन अर्ज दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातल अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायाला अटक करण्यात आली आहे. या तिघांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. डॉ. अजित तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि ससूनमधील शिपाई घटकांबळे या तिघांना ही चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सध्या पश्चिम बंगालमधील कोलकात्यात मुसळधार पाऊस सुरु असून काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बंगळूर : हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण देत आहोत. आम्ही हासन जिल्हा पोलिस अधीक्षकांना तशा सूचना केल्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी येथे सांगितले. दरम्यान, प्रज्वलने एक व्हिडिओ शेअर करत मी 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे सांगितले आहे.
Delhi New Born Baby Care Hospital Fire : हॉस्पिटलचे मालक नवीन खिची आणि डॉ. आकाश यांना विवेक विहार पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना 30 मे पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये. 25 मे रोजी विवेक विहार येथील रूग्णालयाला लागलेल्या आगीत 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
Pune Car Accident Case : अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती पुणे पोलिस अधिकारी यांनी दिली आहे.
उद्या मुख्यमंत्री माॅन्सूनपूर्व बैठक बोलावली आहे. राज्यात पाण्यासाठी टंचाई जाणवत आहे. आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी केली जात असून २५ जिल्हे १० हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण झालेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष दंडाधिकारी न्यायालयात एक खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधानानी मुस्लिमांना घुसखोर संबोधले आणि काँग्रेस सत्तेवर आल्यास ते देशातील मुस्लिमांना संपत्तीचे पुनर्वितरण करतील, असे द्वेषयुक्त भाषण केल्याचा आरोप या तक्रारीत आहे.
पश्चिम बंगाल : रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ही संपूर्ण प्रक्रिया पाच ते सात तास चालणार आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रेमल चक्रीवादळ काल रात्री राज्याच्या किनारी भागात धडकल्यानंतर एनडीआरएफच्या टीमने बशीरहाटमध्ये उन्मळून पडलेली झाडे काढली.
देवदर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील घडली. तेजस दिपकराव कुलकर्णी (वय-20-रा नंदन खेड -औरंगाबाद) असे मृत युवकाचे नाव आहे. तो नृसिंहवाडी येथे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी सह कुटूंब आला होता. पण नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत पोहण्यास गेल्यावर त्याचा बुडून मृत्यू झाला.
विशाल अग्रवालचा ताबा पुणे पोलिसांकडे जाणार आहे. न्यायालयाने यासंदर्भात परवानगी दिली आहे.
पालघर - विक्रमगड - पाली- वाडा मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने सहा वाहनांना धडक दिली आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव ट्रकची दोन बाईक , बस आणि कारला धडक बसली. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची स्थानिकांची माहिती.
राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानं राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. 25 जूनला मतदान आणि मतमोजणी होणार आहे.13 जूनला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल.
नवी मुंबईत उद्या १० ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे . तांत्रिक कामामुळे हा पाणी पुरवठा बंद असणार आहे.
पुण्यातील पब आणि बारबाबत चौकशी करुन ४८ तासांत कारवाई करु असं आश्वासन राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करावी या मागणीवरुन रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन केले आहे.
साधू वासवासी पुलावरील वाहतूक बंद केल्यामुळे माणिक मेहता मार्ग (विधान भवन ते घोरपडी ) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे घोरपडी गावामधील वाहतूक कोंडींची अधिक भर पडली असून सकाळी दहा वाजल्यापासून गावातील मुख्य रस्ता इतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे आंदोलन सुरु आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. पुण्याची उडता पंजाबसारखी अवस्था झाल्याचे अंधारे म्हणाल्या.
जयपूर-मुंबई विमानात धुम्रपान केल्याप्रकरणी मुंबईच्या सहार पोलिसांनी अर्जुन राम थलोरवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राजस्थानचा रहिवासी आहे, पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली, नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. प्रवासादरम्यान, थलोर टॉयलेटमध्ये गेले आणि धूम्रपान करू लागले, त्यामुळे विमानातील अलार्म वाजला... आयपीसीच्या कलम 336 आणि एअरक्राफ्ट ॲक्टच्या कलम 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपसभापती नीलम गोऱ्हे रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. ५ जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. राष्ट्रकुल मंडळाचा संसदीय अभ्यास दौरा आहे.
गुजरात: फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) टीम राजकोटमधील TRP गेम झोनमध्ये तपासणी केली, जिथे 25 मे रोजी भीषण आग लागली आणि 27 लोकांचा मृत्यू झाला.
ईर्स्टन एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
Nanded : नांदेड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई पहायला मिळत आहे. कंधार,मुखेड लोहा या तालुक्यातील अनेक वाडी तांड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
सोलापुरात शहरात पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तर ग्रामीण भागात 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे
जळगाव ते पुणे विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे. आता पुण्याला विमानाने आठवड्यातून चार दिवस जात येणार आहे.
SSC Board Exam : आज महाराष्ट्र बोर्डाच्या (ssc) दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डातर्फे पत्रकार परिषद घेतली जाईल. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती दिली जाईल.
ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी डॉ अजय तावरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. डॉ अजय तावरे हे सध्या ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी आहेत.
नागपूरसह विदर्भात उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या आठवड्यात नागपुरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या चार जणांचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला आहे. चार जणांचा मृत्यू उष्माघाताने झाला, की नाही. याबाबत नागपूर मनपाकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही.
मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.