पुणेः कसबा पोटनिवडणुकीत भाजपला अनेकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. ही पोटनिवडणूक मविआ आणि भाजपने प्रतिष्ठेची केला आहे. मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे. या लढतीत महाविकास आघाडीसोबत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आजारी असलेले खासदार गिरीश बापट प्रचारात उतरल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
आजारी असूनही पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचारात सहभाग घेतला. गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आज केसरीवाड्यात मेळावा पार पडला. यावेळी कसबा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, लोकजनशक्ती पार्टी आणि पतीत पावन संघटना यांचे पदाधिकारीदेखील उपस्थितीत होते.
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती. आज केसरी वाड्यातील मेळाव्यामध्ये बापट हे नाकाला ऑक्सिजन ट्यूब लावून हजर होते. पल्स मीटरने सतत त्यांची तपासणी केली जात होती. थेट व्हीलचेअरवर बसून बापट प्रचारात उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रुपाली ठोंबरेंकडून गिरीश महाजनांवर टीका
पुण्यातील संदीप मोहोळ खुन प्रकरणात ज्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यापैकी संतोष लांडे हा सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याच्यावर याआधी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे. या संतोष लांडेने तो गिरीश महाजनांसोबत प्रचार करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे. मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.