हॉटेलात राहिलो, गादीवर झोपलो, नायतर कोण विचारत होतं; आमदाराची खंत

मात्र आता ही सांगतो की, मत महाविकास आघाडीला दिलं आहे, अपक्ष आमदाराचा खुलासा
Vidhan Parishad Election Live:
Vidhan Parishad Election Live:
Updated on
Summary

मात्र आता ही सांगतो की, मत महाविकास आघाडीला दिलं आहे, अपक्ष आमदाराचा खुलासा

महाराष्ट्रात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यादरम्यान, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून आता मतदान सुरु आहे. (Legislative Council Election Process) राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत संशय व्यक्त केलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेत मत महाविकास आघाडीला देवूनही गैरसमज पसरवले गेले असा खुलासा त्यांनी केला आहे. (Maharashtra vidhan parishad election 2022 news)

Vidhan Parishad Election Live:
हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र, मतदानासाठी पोहोचताच दिलीप मोहितेंची नाराजी

आज विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पंचताराकिंत हॉटेलमध्ये रहायला मिळालं, हातभर गादीवर झोपायला मिळालं. अन्यथा कोण आम्हाला कोण विचारत होतं. मत देऊनही माझ्याबद्दल गैरसमज पसरवले गेले आहेत. मात्र आता ही सांगतो की, मत महाविकास आघाडीला दिलं आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Vidhan parishad election maharashtra 2022 result)

Vidhan Parishad Election Live:
MLC Election 2022 Result: 'किंगमेकर फडणवीसच'; भाजपाचा पाचही जागांवर विजय

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंतचे एकूण 203 मतदान झाले आहे. कॉंग्रेसच्या वीस आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल. तर, राष्ट्रवादीच्या ५ आमदारांचे मतदान अद्याप बाकी. अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप मोहिते, माणिक कोकाटे यांचे मतदान बाकी आहे. आमदार मुक्ता टिळक यांनी मतदानाचा विधानभवनात हक्क बजावला आहे. दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहितेंनी विधानभवनाच्या आवारातच चर्चा केली आहे. आमदार मोहिते गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असून अजित पवारांना भेटल्यावर मतदानसंदर्भात ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Legislative Council Election 2022 News Updates)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.