खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे अशी अर्थसंकल्पाची अवस्था - देवेंद्र फडणवीस

आज सत्ताधारी आमच्या त्यावेळच्या विधानाशी सहमत झालेले दिसत आहेत.
Devendra Fadnavis On SIT Report Leak
Devendra Fadnavis On SIT Report LeakGoogle
Updated on

आम्ही आधी मांडलेल्या गोष्टी राज्य सरकार आता स्वीकारत आहे हे चांगली गोष्ट आहे. आज सत्ताधारी आमच्या त्यावेळच्या विधानाशी सहमत झालेले दिसत आहेत. मात्र तरीही खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी राज्याच्या अर्थसंकल्पाची अवस्था आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. आमच्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या जातात, राज्याची खरी ताकद ओळखून गुंतवणूक केली तर महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज अर्थसंकल्पीय चर्चेत फडणवीस बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, राज्यसरकारने (Mahavikas aaghadi Govt.) मांडलेल्या या अर्थसंकल्पातील मूळ खर्च कळतच नाही. खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारची अवस्था या अर्थसंकल्पाची झाली आहे. या अर्थसंकल्पात किती विश्वास ठेवायचा अशी शंका येते. कर्जाचं प्रमाण वाढलं तरी त्या कर्जातून विकासात्मक खर्च किती होतो ते पहायला हवं. आधी महसुलाचा खर्च दाखवयचा आणि नंतर पुरवठा आणि मागणी करायची. हा राज्यसरकारचा मनमानी कारभार चालू आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

Devendra Fadnavis On SIT Report Leak
खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे अशी अर्थसंकल्पाची अवस्था - देवेंद्र फडणवीस

पुढे ते म्हणाले, विकासाची पंचसूत्रीतील जुन्या योजनांची नव्यानं घोषणा केली आहे. राज्याची प्रगती दाखवताना केंद्राच्या (Central Govt.) योजनांचा आधार घेतला जात आहे. यापैकी फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 52 टक्के निधी खर्च झाला आहे. यासाठी विकास खर्च वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 12 टक्क्यांची वाढ ही कागदोपत्री आहे, सावकारी कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य सरकारमध्ये ज्याची जास्त ताकत त्याला जास्त मदत असे सुत्र दिसत आहे. केवळ दाखवण्यासाठी हे बजेट बनवले गेले आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. मुंबई शहरात एकूण १३० टक्क्यांनी निधी वाढला आहे. राष्ट्रवादीचा (NCP) ३ लाख १४ हजार ८२० ५७ टक्क्यांनी, काँग्रेसचा १ लाख ४४ हजार १९३ कोटी २६ टक्क्यांनी आणि शिवसेनेचा ९० हजार १८१ कोटी म्हणजे १६ टक्क्यांनी निधी वाढला आहे.

यावेळी फडणवीस यांनी विकासाची पंचसूत्री सांगितली. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच प्रमाण वाढत आहे. वीजतोडणी या सुलतानी संकटाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. यामध्ये सूरज जाधवसारख्या शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापल गेलं. त्यानं आत्महत्या केली. यानंतर वाटलं की, लाज वाटून तर किमान सरकार वीज कनेक्शन कापणे बंद करेल पण आजही ते झालं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis On SIT Report Leak
12 ते 14 वयाच्या मुलांना लस, ६० वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()