देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी १४ ट्विट करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीने मुस्लिमांचा कधी आणि कसा अनुनय केला आहे याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी याला प्रत्यूत्तर दिले आहे. तर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. यावेळी मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा ही समाचार घेतला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, १४ एप्रिल दिवशी १४ ट्विट करून बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार असल्याचा केविलवाणा प्रयत्न आरएसएस करत आहे. फडणवीसांनी यातून मुस्लिम द्वेश दाखवला आहे. या देशात मुस्लिम नकोत अस त्यांच मत आहे. मात्र बाबासाहेबांनी संविधानात समतेचा अधिकार सर्वांना दिला आहे असे खडेबोल अमोल मिटकरी यांनी भाजपाला सुनावले. बाबासाहेबांचे संविधान नको असणारे लोक बालिश ट्विट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संविधान सभेतील बाबासाहेबांच्या भाषणातील मुद्द्यांची आठवण करून देताना मिटकरी म्हणाले, बाबासाहेबांना हिंदु-मुस्लिम ही समानता अपेक्षित होती. भारताची राज्यघटना स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय या चार मुल्यावर आधारित आहे. मात्र फडणवीस याच्याविरोधात बोलत आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना झाल्यापासून मुस्लिमांचा अनुनय केला आहे हे महाराष्ट्राने, देशाने पाहिले आहे. याचे पुरावे वेगवेगळ्या माध्यमातून फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत मुस्लिमांच्या मतासाठी नवाब मलिक यांना अध्यक्षपद दिले गेले असाही आरोप दरेकर यांनी केला. मलिकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. बाॅम्बस्फोटाच्या आरोपाची सिध्दता झाल्यानंतरही राजीनामा न घेता त्यांना पाठिंबा देत आहेत याचा अर्थ काय? अशी अनेक उदाहरणे देता येतील यासाठी फडणवीसांनी पुर्नउच्चार केल्याचे स्पष्टीकरण दरेकरांनी केले.
दरेकरांच्या प्रतिक्रियेनंतर मिटकरी म्हणाले, बाबासाहेब म्हणाले होते आर्थिक जीवणात आणखी किती काळ समता नाकारणार आहात. आज फडणवीसांचे ट्विट समता नाकारणारे आणि मुस्लिम विरोधातील आहेत. फडणवीसांचे अनेक फोटो माझ्याकडे आहेत ज्यामध्ये डोक्यावर टोपी घालून दर्ग्यावर चादरी चढवताना दिसत आहेत. मुख्तार अब्बास नकवी आणि शाहनवाज हुसैन हे सुध्दा भाजपामध्ये आहेत. हे तुम्हाला चालत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिल्लीच्या जंतर-मंतरवर ज्यावेळी संविधान जाळले होते त्यावेळी शरद पवार यांनी भूमिका घेतली. त्यावेळी फडणवीसांनी कोणती भूमिका घेतली याचे उत्तर द्या असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवाद वाढला म्हणणाऱ्यांनी राष्ट्रवादीचा इतिहास तपासा. पहिले अध्यक्ष हे माळी समाजाचे, दुसरे अध्यक्ष आदिवासी समाजाचे, तिसरे अध्यक्ष गवळी समाजाचे आहेत. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र ज्यांना संविधान नाकारून मनुस्मृती हवी आहे ते असे बालिश ट्विट करत आहेत असा घणाघातही केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.