राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं अन् सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले, जुलै महिन्यातील नेते मुख्यमंत्री होतात. पण अजितदादांचं मुख्यमंत्रिपद अनेकदा हुकलं आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा टीकेचा भडीमार केला. राज्य सरकावर बरसताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव केल्याचेही पाहायला मिळाले. तसेच उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीवरही भाष्य केलं.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या राज्यातील दोन दिग्गजांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. वाढदिवसाला दोघांनीही एकमेकांविषयी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता. या संदर्भानेच फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. तुमचं आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे? यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला एकमेकांविषयी लिहायला सांगितलं होतं. कित्येक वर्षांपासून अजित पवार राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे. विविध पदांवर त्यांनी कामं केली आहेत. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे काही गोष्टींबद्दल आमचं दुमत असेल, विरोध असेल. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून मी लेख लिहिला.
राजकीय विरोधक म्हटले की आरोप-प्रत्यारोप आलेच. पण राजकारणाच्या पलीकडे अनेक राजकीय नेत्यांचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध हे स्नेहाचे असतात. माझे आणि उद्धव ठाकरे यांचेही जिव्हाळ्याचे संबध आहेत, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, 'होय! मी उद्धवजींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. आम्ही राजकीय विरोधक आहोत आणि ते आत्ता आहोत. मागील 25 वर्षांपासून आम्ही एकमेंकाचे चांगले मित्र आहोत. आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आम्ही एकमेकांच्यासमोर आहोत. वैयक्तिकरित्या अशी परिस्थिती नाही की, मला त्यांना शुभेच्छा देता येत नाहीत. मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो. राजकारणापलिकेड आमची मैत्री आहे.
राज्य सरकारवर टीका करणाता फडणवीस म्हणाले की, पूरग्रस्त भागातील नागिरिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावे. त्यांना तातडीने मदत करायला हवी. पण सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय असल्याचं दिसत नाही. तळीयेत राज्य सरकारची उदासीनता दिसून आली आहे. दोन वर्षांपासून कोविडचं कारण सांगून महाराष्ट्र थांबवलाय. आता पुन्हा राज्यातील विकासकामांना गती मिळायला हवी.
फडणवीस यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे....
सरकार पडेल तेव्हा आम्ही पर्याय देऊ
महाराष्ट्र भाजपसाठी अत्यंत महत्वाचा
केंद्राच्या सरकार खात्याचं कौतुक करायला हवं.
सहकार खातं अमित शाह यांच्याकडे दिल्यामुले केंद्राचं गांभिर्य दिसून येतं.
खातेवाटपचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
नरेंद्र मोदी सर्व माहिती घेऊन निर्णय घेतात
पंकजा मुंडे आणि माझ्यात असलेलं बहिण-भावाचं नात कायम
पंकजा मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली
राज ठाकरे यांच्यासोबतही माझे चांगले संबध आहेत.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प गुंडाळून ठेवलाय
महाराष्ट्रात संघर्षाची वेळ असताना दिल्लीत जाऊन काय करु? मी राज्याच्या राजकारणातच राहणार आहे.
विरोधक सरकारला नव्हे तर जनतेला उत्तरदायी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.