Devendra Fadnavis : अजितदादा एकटेच दिल्लीला गेले, म्हणजे फडणवीस 'साईडलाईन'; अंधारेंचा टोला

Sushma Andhare : अर्थ खातं हे सर्वात महत्वाचे खाते असते. स्वतः मुख्यमंत्री व अर्थ मंत्रीच या खात्यात हस्तक्षेप करीत असतात, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता बाजूला झाले.
Sushma Andhare
Sushma Andhare
Updated on

मुंबई - राज्य मंत्रीमंडळाचा खातेवाटप झालं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अर्थ आणि नियोजन खातं मिळालं आहे. त्यामुळे यावर विविध पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

Sushma Andhare
Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा! छगन भुजबळांची गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका

अर्थ खात्यावर अंधारे म्हणाल्या की, अर्थ खातं हे सर्वात महत्वाचे खाते असते. स्वतः मुख्यमंत्री व अर्थ मंत्रीच या खात्यात हस्तक्षेप करीत असतात, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता बाजूला झाले.

शिवाय प्रत्येक खाते वाटपाच्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत दिल्लीला जायचे, यावेळी अजितदादा एकटेच गेले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाकडून साईडलाईन केले जात असल्याचं स्पष्ट आहे, असा दावाही अंधारे यांनी केला.

Sushma Andhare
CM Shinde News : 'त्यांनी हसतमुखाने दुसरा उपमुख्यमंत्री देखील स्वीकारला…'; CM शिंदेंकडून फडणवीसांच्या मोठेपणाचं तोंडभरून कौतुक

दरम्यान आमच्याकडची ४० चुकार भावंड अजित दादांना कंटाळून तिकडे जात असल्याच सांगत होते. आता तेच दादा त्याच खात्याचे मंत्री झाले. त्यामुळे ज्या सासूसमुळे आमदार भाजपसोबत गेले, तीच सासू त्यांच्या वाट्याला आल्याचा टोलाही अंधारे यांनी शिंदे गटाला लावला. तसेच त्यांच्या हिंदुत्वाला धक्का लागत नाही का, असा सवालही केला.

एकंदरीतच आमच्यातून गेलेली माणसं ही व्यक्तीगत स्वार्थासाठी तिकडे गेली आहेत, हे महाराष्ट्राला कळलं आहे. सर्व माणसं राजकीय नैतिकता हरवलेली माणसं असल्याचंही अंधारे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.