Devendra Fadnavis : ''आपल्या पराभवाचं कारण तीन पक्ष नव्हे तर चार पक्ष'', 'तो' चौथा पक्ष कोणता? फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

राज्यातल्या निकालाची आकडेवारी स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मतं ४३.९ टक्के आहेत आणि महायुतीला मिळालेली मतं ४३.६ टक्के आहेत. पाईंट थ्री पर्सेंट मतांमधली गॅप आहे. परंतु तिकडे ३१ आणि इकडे १७ जागा आहेत. मविआला २ कोटी ५० लाख मतं आहेत. आपल्याला २ कोटी ४८ लाख मतं आहेत. केवळ दोन लाख मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळालेली आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal

BJP Meeting Mumbai : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करुन पदरी आलेलं अपयश फार मोठं नसल्याचं पटवून दिलं. शिवाय तीन विरोधी पक्षांबरोबर आणखी एक फॅक्टर काम करत होता, असं ते म्हणाले.

भाषणाच्या सुरुवातीला बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशामध्ये तिसऱ्यांदा एनडीएचं सरकारआलेलं आहे. ओडिशा, आंध्र प्रधेश आणि अरुणाचल प्रदेशात आपलं सरकार आलेलं आहे. मोदीजी काल बोलले, काही लोकं विजयाचं नरेटिव्ह तयार करतात. त्यांनी तीन निवडणुका मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला एकाच निवडणुकीत देशात मिळाल्याआणि आख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या आहेत.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: काल सगळे खुश असतील... फडणविसांनी मोदींची केली नेहरूंच्या सोबत तुलना

राज्यातल्या निकालाची आकडेवारी स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मतं ४३.९ टक्के आहेत आणि महायुतीला मिळालेली मतं ४३.६ टक्के आहेत. पाईंट थ्री पर्सेंट मतांमधली गॅप आहे. परंतु तिकडे ३१ आणि इकडे १७ जागा आहेत. मविआला २ कोटी ५० लाख मतं आहेत. आपल्याला २ कोटी ४८ लाख मतं आहेत. केवळ दोन लाख मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळालेली आहेत.

''मुंबईचा विचार केला तर त्यांना २४ लाख आणि आपल्याला २६ लाख मतं आहेत. दोन लाख मतं आपल्याला जास्त आहेत. पंरुत त्यांना चार आणि आपल्याला दोन जागा मिळाल्या आहे.''

फडणवीस पुढे म्हणाले की, आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो तर आपण चौथ्या पक्षाशीदेखील लढत होतो, तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह. आपल्याला वाटलं की, या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या हे लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरीता काम करत आहे, त्याला आपण रोखू शकलो नाहीत.

Devendra Fadnavis
Ramoji Filmcity : बाहुबलीच्या सेटपासून ते विदेशी पक्ष्यांपर्यंत सर्वकाही एकाच छताखाली असणारी ‘रामोजी फिल्म सिटी’ तुम्ही पाहिलीय का?

''संविधान बदलणार, हा विषय इतका खालपर्यंत गेला.. पण त्या मानाने आपण त्या प्रचाराला इफेक्टिव्हली काऊंटर करु शकलो नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा चौथा टप्पा आला होता. त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यात २४ जागांपैकी केवळ चार जागा आपण जिंकू शकलो. आपल्या सगळ्या जागा ह्या दुसऱ्या २४ जागांमध्ये निवडून आलेल्या आहेत.'' असं म्हणत फडणवीसांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com