Devendra Fadnavis : ''मला मुक्त करा'', फडणवीसांचा राजकीय बॉम्ब, लोकसभेच्या वाताहतीनंतर उगारलं राजीनामास्त्र

Devendra Fadnavis News : लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर आज भाजपचे नते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

Devendra Fadnavis On Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये देशात तसेच महाराष्ट्रात एनडीएला अपेक्षित यश मिळालं नाही. राज्यात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर आज भाजपचे नते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानंतर फडणवीस यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली.

फडणवीस काय म्हणाले?

जो पराभव झाला, जागा कमी आल्या याची जबाबदारी मी स्वीकारतो. मी मान्य करतो की मी कुठेतरी कमी पडलो आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जी पिछाडी सहन करावी लागली त्याची सर्व जबाबदारी मी (देवेंद्र फडणवीस) स्वीकारतो. मी पक्षाला विनंती करतो की आता मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचे आहे, त्यामुळे भाजप पक्षाच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, ज्यामुळे राहिलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी मला वेळ देता येईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

बाहेर राहिलो तरी सरकरमध्ये जे काही करायचं आहे, ती आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणार आहे. यासंबंधी पक्षातील वरिष्ठांशी मी भेटणार आहे आणि ते सांगतील ते मी करेन असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis
Lok Sabha Election Result 2024 : ‘एनडीए’ काठावर पास, अयोध्या व अमेठीत पराभव; देशभरात काँग्रेसला संजीवनी

राज्यात मविआची मुसंडी

४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालानंतर फडणवीस यांनी आपण कुठेतरी कमी पडल्याचे मान्य केलं आहे. दरम्यान दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात भाजपप्रणित एनडीएला १७ जागा जिंकता आल्या. ज्यामध्ये भाजप ९, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ७, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १ जागा मिळाली. तर इंडिया आघाडीतील काँग्रेसने १३, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८ जागा जिंगल्या आहेत.

Devendra Fadnavis
Beed Lok Sabha Election 2024 : गलती से मिस्टेक हो गया... 'तुतारी'ऐवजी 'पिपाणी'चं बटन दाबल्याने सोनवणेंची लीड 55 हजारांनी घटली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.