‘देवेंद्र फडणवीस हे मुंबई, दिल्लीच्या राजकारणात रमले; त्यांनी...’

atul londhe
atul londheatul londhe
Updated on

नागपूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते म्हणून फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे काहीच केले नाही. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विदर्भाचा एकही प्रश्न त्यांनी मांडला नाही. आपले नेतृत्व उभे करण्यासाठी विदर्भ व नागपूरच्या जनतेचा वापर करून घेतल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (atul londhe) यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाल्यावर तरी विदर्भातील प्रश्नांवर बोलतील असे वाटत होते. परंतु, त्यांनी विदर्भातील जनतेच्या अपेक्षाभंग केला. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा फक्त मंत्री, मुख्यमंत्री होण्यासाठी वापरला. राज्यात व केंद्रात सत्ता आल्याने विदर्भाचे राज्य करू असे आश्वासन भाजपने वैदर्भीयांना दिले होते. याचाही विसर फडणवीस यांना पडला, असेही अतुल लोंढे (atul londhe) म्हणाले.

atul londhe
मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी केले तुकडे; नदीत फेकले

विरोधात असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असो वा विदर्भातील इतर महत्त्वाच्या प्रश्नावर सातत्याने झटत होते. विधानसभेत आवाज उठवत होते. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विदर्भाकडे दुर्लक्ष केले. आता विरोधीपक्षनेते आहेत. मात्र, मागील दोन अडीच वर्षांत विदर्भातील धान, बेरोजगारीचा, सारखा मोठे बंद असलेल्या प्रकल्प असो किंवा नागपुरातील कोणताच मुद्दा उपस्थित केला नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना दोन आठवड्यांपेक्षा जास्त नागपूरचे हिवाळी अधिवेशन घेतले नाही. आता ते विदर्भ व नागपूरला विसरले आहे. मुंबई व दिल्लीच्या राजकारणात रमले आहेत. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे आमदार असले तरी ते आता मुंबईच्या राजकारणात (politics) रमले आहे. त्यामुळे त्यांनी यापुढे मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढवावी, असा टोलाही अतुल लोंढे (atul londhe) यांनी मारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()