Devendra Fadanvis: 'शिवसेना, राष्ट्रवादी सोबत आले तरी भाजपच बॉस', फडणवीसांचं मोठं वक्तव्य, महायुतीवर होणार परिणाम?

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या विस्तारकांशी महत्त्वाची बैठक पार पडली
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपची दादर येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं आहे.

या बैठकीमध्ये फडणवीसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तारकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर 'राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे', असं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Devendra Fadanvis
Nanded Hospital Deaths : '...म्हणून गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली!'; २४ तासात २४ मृत्यूनंतर शरद पवारांनी करून दिली ठाण्यातील 'त्या' घटनेची आठवण

सध्या राज्यात शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या एकत्रिकरणाने सरकार चालत आहे. अशातच भाजप हाच बॉस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्यांच हे वक्तव्य आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करेल का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

तर बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 'स्वतः साठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर फडणवीस यांनी विस्तारकांना पुढील एका वर्षाचा रोडमॅप बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Devendra Fadanvis
Shrikant Shinde : 'एक बार जो हमने कमिटमेंट कर दी, तो हम किसी की भी नही सुनते..'; खासदार शिंदेंचा ठाकरेंना टोला

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आले असले, तरी राज्यात भाजप ईज ऑल्वेज बॉस आहे. युतीमधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे."

मी इथे उभा आहे तो पक्षामुळे- फडणवीस

"मी इथं उभा आहे तो पक्षामुळेच. मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल. स्वतःसाठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम विस्तारकांना करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम विस्तारकांना करायचे आहे. राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांना सुद्धा निवडून आणायची जबाबदारी आपल्यावर असेल", असंही फडणवीस म्हणालेत.

Devendra Fadanvis
Weather Update : राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, अशी असेल राज्यातील पावसाची परिस्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.