Devendra Fadnavis: " 'त्या' गोष्टीमुळे भाजपला महाराष्ट्रात फटका," फडणवीसांची कबुली पण रोख कुणाकडे?

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: गेल्या निवडणुकीत 1 जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष यंदा 13 जागा घेत अव्वल ठरला आहे. तर 2019 मध्ये 28 जागा जिंकणारा भाजप 9 जागांवर घसरला आहे.
Devendra Fadnavis BJP Maharashtra Lok Sabha Election Result 2024
Devendra Fadnavis BJP Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Esakal

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकाल काल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले.

गेल्या निवडणुकीत 1 जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष यंदा 13 जागा घेत अव्वल ठरला आहे. तर 2019 मध्ये 28 जागा जिंकणारा भाजप 9 जागांवर घसरला आहे.

या निकालावर महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वो देवेंद्र फडणवीस आज पहिल्यादा बोलले ते म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला फटका बसला हे खरे आहे. यावेळी आम्हाला महाविकास आघाडीसह काही मुद्द्यांशीही लढावे लागले.

काय म्हणाले फडणवीस?

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस म्हणाले, "या निवडणुकीत महाराष्ट्रा आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही हे खरे आहे. यासाठी अनेक घटक जबादार आहेत. आम्हाला ही निवडणूक महाविकास आघाडीसह खोट्या प्रचाराविरोधातही लढावी लागली. विरोधकांनी भाजप संविधान बदलणार अशा वावड्या उठवल्या त्या थोपवण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे त्याचा फटका निवडणुकीतही बसला."

Devendra Fadnavis BJP Maharashtra Lok Sabha Election Result 2024
Devendra Fadnavis : ''मला सरकारमधून मुक्त करा'', देवेंद्र फडणवीसांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

महाराष्ट्रात काय झाले?

दरम्यान नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महराष्ट्रात महाविकास आघाडी सरस ठरली आहे. महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का देत 29 जागांवर विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसने 13, शिवसेना ठाकरे यांनी 9 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांना 8 जागा मिळल्या.

तर गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भाजपची 28 जागांवरून 9 जागांवर घसरण झाली आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेने 7 जागा मिळवल्या आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला मात्र, 1 जागेवर समाधान मानावे लागले.

Devendra Fadnavis BJP Maharashtra Lok Sabha Election Result 2024
Maharashtra Lok Sabha: महाराष्ट्रात भूकंप होणार? CM शिंदेंच्या पक्षाचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? बड्या नेत्याचा दावा काय

देशात काय?

दरम्यान देशात लोकसभेच्या 543 जागांपैकी भाजपने 240 तर काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 292 तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशातील पुढचे सरकार युतीचेच असणार हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. सरकार स्थापनेबाबत बुधवारी एनडीएची बैठक होणार आहे.

विरोधी पक्षांची इंडिया आघाडीचीही आज बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत, मात्र यावेळी भाजपला सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. विशेषतः जेडीयू आणि टीडीपीचा पाठिंबा आवश्यक असेल.

विरोधी आघाडी जेडीयू आणि टीडीपीलाही आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करू शकते. दोन्ही पक्षांनी एनडीएला पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले असले तरी विरोधी आघाडी मात्र आपल्या प्रयत्नात व्यस्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com