नुकत्याच पारपडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला निसटते बहुमत मिळाले आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीत 28 जागा जिंकणाऱ्या भाजपची यंदा 9 जागांवर घसरण झाली आहे.
दरम्यान आज मुंबईत महाराष्ट्र भाजपचा मेळावा सुरू आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यासह ते म्हणाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या या यशामध्ये 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठ होता. मात्र, यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही.
ते पुढे म्हणाले, देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बणणारे नरेंद्र मोदी दुसरी व्यक्ती असणार आहेत. यापूर्वी हा विक्रम फक्त नेहरूजींनी केला होता. या शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या प्रत्येकाला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा आनंद आहे. आम्ही सर्वांनी ठरवले आहे की जास्त जागा का आल्या नाहीत त्याचे कारण शोधून काढले पाहिजे. उन्हाळा खऱ्या अर्थाने संपत आला आहे. पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. पावसात जे पेरले जाते ते उगवते. विजयाचे श्रेय अनेकजन घेतात पण पराभवाची जबाबदारी कोणीच घेत नाही. पण ही जबाबदारी मी घेतली आहे. तुम्ही सर्वांनी उत्कृष्ट काम केले आहे, पण आम्ही राजकीय गणितात अडकलो आहोत.
"मी लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेतृत्व केले. त्यामुळे या पराभवाला मीच जबाबदार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तळागाळात जाऊन काम करता यावे म्हणून मी माझे पद सोडण्यास सांगितले होते. पण सर्वोच्च नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला,” असे फडणवीस म्हणाले.
"काही लोकांना वाटले की मी निराश झालो आहे, पण मी पळून जाणार नाही. माझ्या मनात एक रणनीती आहे," असे फडणवीस यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत शाह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले होते.
महाराष्ट्रात भाजप महायुतीचा एक भाग आहे, ज्यात शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे.
एकत्रितपणे, महायुतीने महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी केवळ 17 जागी विजय मिळवले. तर महाविकास आघाडीने 30 जागीत तर सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी आता काँग्रेसचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले आहे.
दरम्यान महायुतीत भाजपने 9, शिंदे गटाने 7, तर राष्ट्रवादीला (अजित पवार गट) फक्त एक जागा मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.